शहरं
Join us  
Trending Stories
1
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
2
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
3
'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...
4
Ganeshotsav 2025 Train: गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून?
5
अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर! छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश
6
"मी २५ वर्षं आमदार, १० वर्ष लोकसभेचा खासदार...!"; छावाचे कार्यकर्ते आले, पत्ते टाकले, नंतर काय घडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
8
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
9
श्रावणात नैवेद्याच्या ताटाची लज्जत वाढवेल 'हा' कोबीचा चटका; कमी साहित्यात चविष्ट रेसेपी 
10
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
11
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
12
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
13
घरात वीज, शौचालय नाही, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास...; भारताच्या लेकीचं जपानमध्ये कौतुक
14
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
15
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
16
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
17
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
18
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
19
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
20
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...

संपाला नेत्यांचाही पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:26 IST

विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचा-यांनी सुरु केलेल्या संपावर तोडगा निघालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचा-यांनी सुरु केलेल्या संपावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे तिस-या दिवशी गुरुवारी एकही लालपरी धावली नाही. दरम्यान, खाजगी ट्रॅव्हल्स् बस आणि वाहनांचा प्रवाशांना आधार घ्यावा लागला. तीन दिवसातील संपामुळे बीड विभागाला सुमारे सव्वा कोटी रुपयांचा फटका बसला आहे. संपकरी कर्मचा-यांच्या नेत्यांनी भेटी घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारने तातडीने प्रश्न सोडविण्याची मागणी केली.दरम्यान, वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार कामावर हजर राहण्यासाठी प्रत्येक आगारासमोर नोटीस डकविण्यात आल्या होत्या. तीन दिवसांच्या संपामुळे बीड विभागाचे सुमारे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुएसटीचे कर्मचा-यांच्या मागण्या शासनाने मान्य करून त्यांना न्याय द्यावा व लाखो प्रवाशांचे होणारे हाल त्वरित थांबवावे नसता या एसटी कर्मचारी वर्गाच्या हितासाठी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा असा इशारा सरचिटणीस प्रा.टी.पी मुंडे मुंडे यांनी दिला. यावेळी पदाधिकारी सुर्यकांत मुंडे, दत्तात्रय ढवळे, बाबूभाई नंबरदार, प्रा.विजय मुंडे, प्रदीप मुंडे, प्रा.संदीपान मुंडे, राहुल कांदे, मधुकर ढाकणे, शिवा बडे, कामगार नेते रमेश गित्ते, गणपत मुंडे व संघटनेचे सर्व कामगार उपस्थित होते.माजलगावात गोंधळमाजलगांव बसस्थानक परिसरात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या वक्तव्यावरून एसटी कर्मचारी संतप्त झाले. एसटीच्या संपाचा फायदा घेत खासगी वाहतुक दारांनी दर वाढवुन मनमानी केल्याच्या तक्रारी आहेत.संपाला सरकारच जबाबदारपरळी एस.टी कर्मचा-यांच्या संपाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. तीन दिवसांपासुन होणा-या सर्वसामान्य प्रवाशांच्या त्रासास राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.यावेळी पदाधिकारी अ‍ॅड.गोविंद फड, बाजीराव धर्माधिकारी, सुर्यभान मुंडे, वाल्मिक कराड, माणिक फड, सुरेश टाक, मोहन सोळंके, भाऊसाहेब कराड, गोपाळ आंधळे, सय्यद सिराज, दत्ता सावंत, गोविंद मुंडे, विजय भोयटे आदी उपस्थित होते.