शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सुपर! आता छत्रपती संभाजीनगरात ‘रोबोटिक’ने होईल कॅन्सर सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 20:11 IST

शासकीय कर्करोग रुग्णालय : ३२ कोटी रुपयांच्या ‘रोबोटिक सर्जिकल सिस्टीम विथ ॲक्सेसरीज’ खरेदीस मंजुरी

छत्रपती संभाजीनगर : शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) लवकरच रोबोटिक कॅन्सर सर्जरीला सुरुवात होणार आहे. रुग्णालयातील गायनाॅकोलाॅजी ऑन्कोलाॅजी विभागास ३२ कोटी रुपयांची ‘रोबोटिक सर्जिकल सिस्टीम विथ ॲक्सेसरीज’ खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मराठवाड्यासह राज्यभरातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी शासकीय कर्करोग रुग्णालय आधारवड ठरत आहे. येथील सोयीसुविधांमध्ये वाढ होत असून, या ठिकाणी लवकरच रोबोटिक सर्जरीचाही ‘श्रीगणेशा’ होणार आहे. अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड हे रुग्णसेवावाढीसाठी प्रयत्नशील आहेत. ‘रोबोटिक सर्जिकल सिस्टीम’मुळे रुग्णसेवेचा दर्जा उंचावेल, असे डाॅ. अरविंद गायकवाड म्हणाले.

रोबोटिक सर्जरीचा फायदा‘रोबोटिक सर्जिकल सिस्टीम’मधील लवचीक असे रोबोटिक हात आणि उपकरणांमुळे शस्त्रक्रियेत अचूकता वाढते. शस्त्रक्रियेतील गुंतागुंत कमी होते. त्यामुळे शस्त्रक्रिया सहजतेने आणि अचूकतेने करता येते. या आधुनिक तंत्रज्ञानाने एक तज्ज्ञ सर्जन हा रोबोटिक आर्मद्वारे थ्रीडी व्हिज्वलायझेशनच्या मदतीने शस्त्रक्रिया करतात. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत जलद गतीने सुधारणा होते. रुग्णालयात कमी दिवस थांबावे लागते.

कोणत्या शस्त्रक्रिया होतील?गायनाॅकोलाॅजी ऑन्कोलाॅजी विभागाच्या प्रमुख डाॅ. अर्चना राठोड म्हणाल्या, नियमित सर्जरीत (ट्रॅडिशनल), ओपन सर्जरीत आणि विशेषत: कॅन्सरच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला मोठी चीर द्यावी लागते. परंतु रोबोटिक सर्जरीत खूप छोट्या छिद्रातून आणि थ्रीडी कॅमेऱ्याद्वारे कॅन्सर सर्जरी सहजतेने करणे शक्य होते. रोबोटिकद्वारे गर्भाशयाच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया करता येतील. कॅन्सरमुळे गर्भाशय, अंडाशय काढता येईल. अतिशय लठ्ठ महिलांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही रोबोटिकद्वारे सहजतेने करता येईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMedicalवैद्यकीय