शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर’! छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगरला रेल्वेची ‘डबल लाइन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 17:54 IST

नव्याने ‘डीपीआर’ तयार करणे सुरू; सध्याची पीटलाइन होणार २४ बोगींची, सोबत आखणी एक नवीन पीटलाइन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर रेल्वे मार्ग करण्यासाठी ‘डीपीआर’ तयार करण्यात आला. परंतु, हा ‘डीपीआर’ एकेरी मार्गाचाच असल्याने दुहेरी रेल्वेमार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना आली. त्यानुसार दुहेरी रेल्वेमार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. नोव्हेंबरपर्यंत तो पूर्ण होईल. या रेल्वेमार्गात १३ रेल्वे स्टेशन राहतील, अशी माहिती खा. डाॅ. भागवत कराड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

खा. डाॅ. कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी रेल्वे स्टेशनवर रेल्वेप्रश्नांसंदर्भात बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार, निरज अग्रवाल, मध्य रेल्वेचे आर. के. यादव, अनंत बोरकर, आदी उपस्थित होते. या बैठकीविषयी डाॅ. कराड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. रेल्वे स्टेशनवर सध्या सुरू असलेल्या १६ बाेगीच्या पीटलाइनचे काम सप्टेंबरअखेर पूर्ण होऊन ऑक्टोबरमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. ही पीटलाइन पुढे २४ बोगींची होईल. मालधक्का दौलताबादला स्थलांतरित झाल्यानंतर बाजूलाच आणखी एक पीटलाइन होईल, अशी माहिती डाॅ. कराड यांनी दिली.

वांबाेरीमार्गे जाईल रेल्वेमार्ग, हे राहणार स्टेशनछत्रपती संभाजीनगर-अहमदनगर हा रेल्वेमार्ग वांबोरीमार्गे जाईल. यातून डोंगराचा अडथळा येणार आहे. साजापूर - आंबेलोहोळ - येसगाव - बाबरगाव - गंगापूर- जामगाव - देवगड - नेवासा - उस्थल दुमला - खारवांडी - शनिशिंगणापूर- मोरे चिंचोरे- ब्राह्मणी हे स्टेशनही राहतील.

बीड- पैठण- छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव रेल्वेमार्गासाठी प्रयत्नबीड-पैठण-छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर- वेरुळ-कन्नड- चाळीसगाव रेल्वेमार्ग हे इकोनाॅमिक इंटर्नल रेट ऑफ रिटन (ईआयआरआर) च्या माध्यमातून करावे, यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली जाईल, असेही डाॅ. कराड यांनी सांगितले.

हेही होणार...- रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीत रेल्वे रुळावर ५० हजार स्के. फूटचे छत, विमानतळाप्रमाणे कमर्शियल शाॅप, रेस्टाॅरंट, चार दादरे.- नव्या इमारतीत वेरुळ लेणीसह ऐतिहासिक स्थळांचे स्वरूप देणार.- मुकुंदवारी रेल्वे स्टेशनचाही विकास करणार.- अंकाई (मनमाड)- छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे ९६४ कोटींतून दुहेरीकरण.- उस्मानपुरा रेल्वेगेटवर भुयारी मार्ग, रेल्वे स्टेशन एमआयडीसीत उड्डाणपूल होईल. ‘डीपीआर’साठी ७० कोटी.- दौलताबाद येथे मालधक्क्यासाठी ९ एकर जागा मिळाली, आणखी ३ एकर मिळणार.- भांगसी माता गड रस्त्यावरील रेल्वेगेटवर भुयारी मार्गाचे काम सुरू.- गणेशनगर येथे रेल्वे रुळावर स्लॅब टाकून मार्ग करणार. शिवाजीनगरवासीयांना होईल फायदा.- लासूर स्टेशन येथे दोन भुयारी मार्ग.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेtourismपर्यटन