शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

सुपर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘डिक्टिन्शन’मध्ये ३६.१५ टक्के विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:20 IST

जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९३.६० टक्के; ३६.१५ टक्के विद्यार्थी प्रावीण्य, प्रथम श्रेणीत ३४.४४ टक्के उत्तीर्ण

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल ९३.६० टक्के लागला. जिल्ह्यातील ६६ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ६२ हजार ३६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे यंदा प्रथम श्रेणीपेक्षा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या म्हणजे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. तब्बल २२ हजार ५४६ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, तर २१ हजार ४८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

जिल्ह्यात द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण (४५ ते ५९.९९ टक्के गुण घेणारे) विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १४ हजार ३७५ आहे, तर तृतीय श्रेणी ( ३५ ते ४४.९९ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण ) विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ९६० आहे. ही टक्केवारी अवघी ६.३४ टक्के आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना भरभरून गुण मिळाल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात उत्तीर्ण होण्यात मुलीच आघाडीवर आहेत. शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालानुसार जिल्ह्यात सिल्लोड तालुक्याचा सर्वाधिक ९६.८९ टक्के निकाल लागला. सर्वांत कमी निकाल पैठण तालुक्याचा ९२.१४ टक्के लागला. यंदा जिल्ह्याचा निकाल ९३.६० टक्के लागलेला असताना मागील वर्षी हाच निकाल ९५.५१ टक्के होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १.९१ टक्क्यांनी निकाल घसरला. काॅपीमुक्त अभियानामुळे निकालात घट झाल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात एका परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळला होता, तर परीक्षेनंतर ११ गैरमार्गाचे प्रकरणे समोर आली. यात उत्तरपत्रिका फाडणे, अक्षरात बदल, रेषा मारणे आदी प्रकारांचा समावेश आहे.

जिल्ह्याचा निकालनोंदणी केलेले विद्यार्थी - ६६, ९८२परीक्षा दिलेले विद्यार्थी - ६६, ६२६उत्तीर्ण विद्यार्थी - ६२, ३६६टक्केवारी- ९३.६० टक्केउत्तीर्ण मुले-३३,८९१ (९१.७७ टक्के)उत्तीर्ण मुली - २८,४७५ (९५.८८ टक्के)

जिल्ह्यातील श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी संख्याश्रेणी - उत्तीर्ण विद्यार्थीप्रावीण्य श्रेणी- २२,५४६ (३६.१५ टक्के)प्रथम श्रेणी - २१,४८५ (३४.४४ टक्के)द्वितीय श्रेणी- १४,३७५ (२३.०४ टक्के)उत्तीर्ण - ३,९६० (६.३४ टक्के)एकूण उत्तीर्ण - ६२, ३६६

-------तालुक्यानिहाय जिल्ह्याचा निकाल१) छत्रपती संभाजीनगरपरीक्षार्थी-२७,३६०उत्तीर्ण-२५,५२५टक्केवारी-९३.२९ टक्केउत्तीर्ण मुले- १३, ६६७ (९१.६२ टक्के)उत्तीर्ण मुली- ११,८५८ ( ९५.२९ टक्के)-------२) गंगापूरपरीक्षार्थी- ९,००३उत्तीर्ण- ८,३४७टक्केवारी-९२.७१ टक्केउत्तीर्ण मुले- ४,५९० (९०.९९ टक्के)उत्तीर्ण मुली-३,७५७ (९४.८९ टक्के)-------३) कन्नडपरीक्षार्थी-५,६२३उत्तीर्ण-५,२०३टक्केवारी-९२.५३ टक्केउत्तीर्ण मुले-२,७७५ (८९.६३ टक्के)उत्तीर्ण मुली-२,४२८ (९६.०८ टक्के)------४) खुलताबादपरीक्षार्थी-२,५४५उत्तीर्ण-२,४१४टक्केवारी-९४.८५ टक्केउत्तीर्ण मुले-१,३८५ (९३.४५ टक्के)उत्तीर्ण मुली-१,०२९ (९६.८० टक्के)-------५) पैठणपरीक्षार्थी-५,९२२उत्तीर्ण-५,४५७टक्केवारी-९२.१४ टक्केउत्तीर्ण मुले- २,९९६ (८९.४८ टक्के)उत्तीर्ण मुली- २,४६१ ( ९५.६१ टक्के)------६) सिल्लोडपरीक्षार्थी-६,७५३उत्तीर्ण-६,५४३टक्केवारी - ९६.८९ टक्केउत्तीर्ण मुले - ३,५२१ ( ९५.९१ टक्के)उत्तीर्ण मुली-३,०२२ (९८.०५ टक्के)--------७) सोयगावपरीक्षार्थी-१,५४३उत्तीर्ण-१,४४०टक्केवारी- ९३.३२ टक्केउत्तीर्ण मुले-८४१ (९१.४१ टक्के)उत्तीर्ण मुली-५९९ (९६.१४ टक्के)--------८) वैजापूरपरीक्षार्थी-४,६१५उत्तीर्ण-४,३८०टक्केवारी-९४.९० टक्केउत्तीर्ण मुले- २,३९० (९२.८५ टक्के)उत्तीर्ण मुली-१,९९० (९७.५० टक्के)--------९) फुलंब्रीपरीक्षार्थी-३,२६२उत्तीर्ण-३,०५७टक्केवारी-९३.७१ टक्केउत्तीर्ण मुले- १,७२६ (९१.९५ टक्के)उत्तीर्ण मुली-१,३३१ (९६.१० टक्के)

नव्याने यश संपादन करागुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी १४ ते २८ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. जून-जुलैमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी १५ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन आवेदनपत्र भरून घेण्यात येईल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीने यश संपादन करावे.- अनिल साबळे, विभागीय अध्यक्ष, विभागीय मंडळ

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEducation Sectorशिक्षण क्षेत्र