शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Video: किरणांची तेजाशी भेट! वेरूळ लेणीत किरणोत्सव, उजळून निघाली बुद्ध मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 18:43 IST

वेरूळ येथील लेणी क्रमांक १० मध्ये दरवर्षी वर्षी १० व ११ मार्च रोजीच होतो किरणोत्सव

- सुनील घोडके खुलताबाद - वेरूळ येथील जगप्रसिद्ध वेरूळ येथील दहा नंबरच्या लेणीत आज सायंकाळी बुद्ध मूर्तीवर अद्भुत किरणोत्सव झाला. हा नजारा डोळ्या साठवण्यासाठी देश विदेशातील पर्यटकांनी गर्दी केली होती. हा किरणोत्सव सायंकाळी ५ वा. ३ मी. ते ५ वा. १० मिनिटे असा एकूण सात मिनिट झाला.

कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिरात अथवा प्रतापगड येथील श्री तुळजाभवानी मंदिरात होणारा किरणोत्सव अनेकांनी अनुभवला असेल . सूर्याची मावळतीची किरणे खोल गाभाऱ्यात असलेल्या देवतांच्या मूर्तीवरील चेहऱ्यांना कशी उजळवतात ते पहाणे खरोखरच रंजक आणि रोमांचित करणारा अनुभव असतो. अशाच प्रकारचा किरणोत्सव ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ येथील दहा नंबरच्या लेण्यातील बुद्ध मूर्तीवर अनुभवायला मिळाला. हा क्षण अनुभवण्यासाठी हजारो पर्यटकांची गर्दीही झाली होती. यावेळी इतिहासतज्ज्ञ डॉ संजय पाईकराव, डॉ. भाऊसाहेब कुऱ्हाडे, अश्विन जोगदंड, योगेश जोशी, विनोद मोरे, किरण काळे आदींनी हा किरणोत्सव सोहळा पाहिला. 

वर्षातून दोनच दिवस होतो किरणोत्सव स्थापत्य कलेचा अद्धभुत नमुना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण 34 लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार आहेत. यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर उत्तरायणात सूर्यकिरणे येतात. यामुळे किरणोत्सव होऊन बुद्धमूर्ती उजळून निघते. वर्षातून दोनच दिवस १० व ११ मार्च रोजी असा किरणोत्सव होऊन बुद्ध प्रतिमा उजळून निघते. 

बौद्ध स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना लेणी क्र 10 मधील बुद्धाच्या प्रतिमेवरील किरणोत्सव बौद्ध कला व स्थापत्य अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. तेजस्वी सूर्य किरणांची दुसऱ्या तेजाशी भेट आहे असेच म्हणावे लागेल.- डॉ. संजय पाईकराव, बौद्ध कला व स्थापत्याचे अभ्यासक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबादArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण