शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळा वाढला, फळे स्वस्त; पण आरोग्यासाठी काय खायला हवे ?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 27, 2024 18:59 IST

फळांचे दर स्थिर : आरोग्य- खिशालाही फायदेशीर

छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. दुपारच्या वेळी तर उन्हाचा चटका जाणवत आहे. अशावेळी शरीराला थंड ठेवण्यासाठी व ऊर्जा निर्माण करण्यासाठी रसाळ फळांचा वापर वाढला आहे. त्यात सध्या रमजान महिना सुरू आहे. रोजा (उपवास) सोडण्यासाठी फळांचे सेवन केले जात आहे. फळे स्वस्त असल्याने सर्वसामान्य जनताही ’दिल खोल के’ फळे खरेदी करीत आहेत.

तापमान ३८.८ अंशांवरदररोज तापमानात वाढ होत आहे. शनिवारी ३८.६ अंश तापमान नोंदवले गेले. येत्या आठवड्यात तापमान ४० अंशांवर जाऊन पोहोचेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

उन्हाळ्यात कोणती फळे खायला हवी?१) टरबूज : टरबूजमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. यात फायटोकेमिकल्स आणि व्हिटॅमिन सी देखील असते. टरबूज खाल्लास घामामुळे गमावलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळण्यास मदत होते.२) आंबा : आंब्यामध्ये ८२ टक्क्यांपर्यंत पाणी असते. ते ॲन्टिऑक्सिडंट्सने भरलेले असते. आंबा खाल्ल्याने शरिरातील कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.३) संत्रा : संत्र्यामध्ये ८२ टक्के पाणी असते. हृदयाचे कार्य सुधारणे. शरीरातील एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे आणि पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी प्रदान यासारखे अनेक फायदे संत्रा सेवनाने होतात.४) किवी : किवीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम यासाखरी खनिजे असतात. पचनशक्ती सुधारण्यासाठी किवी सेवन केले पाहिजे.

फळांचे दर काय?फळांचा प्रकार दर (प्रतिकिलो)१) टरबूज : २० ते २५ रुपये२) आंबे : १०० ते १५० रुपये३) चिकू : ५० ते ६०रुपये४) संत्री : ४० ते ५०रुपये५) खरबूज : ४० ते४५ रुपये६) पपई : ५० रुपये७) किवी : १०० रुपये (३ नग)

शहागंजमध्ये दररोज १० टन फळांची विक्रीफळांची मोठी बाजारपेठ शहागंज परिसर बनला आहे. रमजान महिना व उन्हाळ्याचे दिवस यामुळे येथे दररोज १० टन फळांची विक्री होते. रसाळ फळे रोजा (उपवास) सोडण्यासाठी सर्वाेत्तम आहेत. यामुळे फळांची मोठी विक्री होत आहे.- जुनेद खान, फळ वितरक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfruitsफळे