छत्रपती संभाजीनगर : आता पांढरे कपडे परिधान करण्याचा हंगाम आला असे वाचल्यावर अनेकांना नवल वाटले असेल. असा काही हंगाम असतो यावर अनेकांनी विचारही केला नसेल. पण उन्हाळा, लोकसभा निवडणूक, रमजान महिना आणि महापुरुषांची जयंती यामुळे पांढऱ्या रेडिमेड ड्रेसला मोठी मागणी आहे. त्यादृष्टीने तयार कपडे विक्रेत्यांनी पांढऱ्या रंगाच्या ड्रेसचा स्टॉक करून ठेवण्यास सुरुवात केली आहे.
कडक पांढऱ्या शुभ्र खादी पोशाखाने निवडणुकीत रुबाबनिवडणूक आली की, पांढऱ्या शुभ्र खादी, सुती कपड्यांना लोकप्रतिनिधी जास्त पसंती देतात. कारण, कडक शुभ्र खादी व त्यावर जॅकेट असा रुबाबच काही और असतो. स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणास्थान राहिलेली खादी आता आणखी पांढरी शुभ्र झाली आहे. आमदार, माजी नगरसेवक ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण कडक खादी खरेदी करतात. कारण, निवडणूक प्रचारातील खादी व कॉटनच्या कपड्यांची फॅशन आहे.
निवडणुकीसाठी एकापेक्षा अधिक कपडे खरेदीकडक इस्त्री केलेले खादी, लिननचे ड्रेस परिधान करून उमेदवार व कार्यकर्ते प्रचारात उतरणार आहेत. उन्हाळा असल्याने घामामुळे प्रचारात कपडे लवकर खराब होतात. यामुळे उमेदवार असो वा कार्यकर्ते नवीन पाचपेक्षा अधिक ड्रेस खरेदी करतात. प्रचारात सकाळी एक व सायंकाळी एक असे दोन ड्रेस दररोज लागतात. यामुळे पांढऱ्या पोशाखाला मागणी वाढली आहे.
कुर्ता पातळ, पण कडक पाहिजेकार्यकर्ते असो वा सर्वसामान्य नागरिक ; त्यांना पांढरा कुर्ता पातळ पण कडक पाहिजे असतो. त्यासाठी विशेष कपडा बाजारात आला आहे. तो कुर्ता धुतल्यानंतर इस्त्री केला की, कडक दिसतो.
७० टक्के फुल, ३० टक्के हाफ शर्टडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जन्मकल्याणक महोत्सव, महात्मा बसवेश्वर जयंती, भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकामध्ये पांढरा कॉटन शर्ट व पँट परिधान करणाऱ्यांची संख्या जास्त असते. पांढरा शर्ट घालणाऱ्यापैकी ७० टक्के लोक फुल शर्ट तर ३० टक्के लोक हाफ शर्ट परिधान करतात.
५० हजार पांढरे रेडिमेड ड्रेस बाजारातनिवडणुका, महापुरुषांची जयंती, भगवंतांचा जन्मकल्याणक महोत्सव यानिमित्ताने बाजारात ५० हजारांपेक्षा अधिक रेडिमेड पांढरे ड्रेस व्यापाऱ्यांनी मागविले आहेत. ५०० ते १७०० रुपयांदरम्यान पांढरे शर्ट व ८०० ते १५०० रुपये दरम्यान पॅन्ट विकत आहे.- सुनील अग्रवाल, व्यावसायिक
रमजान ईदसाठीही पांढरा पठाणी ड्रेसरमजान महिना व ईदसाठी पांढऱ्या पठाणी ड्रेसलाही मागणी आहे. विशेषत: नमाजसाठी पांढरा पठाणी ड्रेस घातला जातो.-अजय तलरेजा, व्यावसायिक
पांढरा रंगाचा ड्रेस का ?१) उन्हाळ्यात खादी व कॉटनचे कपडे वापरणे आरोग्यदृष्ट्या चांगले असते.२) खादी घाम शोषून घेते, शरीराला थंड ठेवते.३) सुटसुटीत कपडे घालावेत; जास्त फिटिंगचे कपडे त्रास होऊ शकतो.