शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या आंदोलनास यश; शार्दूलवाडी येथील हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर पोलीसांची धाड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 19:40 IST

या प्रकरणी एका जणाविरूध्द गुन्हा दाखल करून त्यास गजाआड करण्यात आले. 

ठळक मुद्देदोनशे लीटर दारूचे रसायन केले नष्ट पोलिसांनी गावठी अड्डा केला उध्वस्त 

खुलताबाद (औरंगाबाद ) :  तालुक्यातील शार्दूलवाडी येथील माटेगाव धरण परिसरात गावठी दारूचा अड्डा खुलताबाद पोलीसांनी आज उध्वस्त केला. या ठिकाणचे दोनशे लीटर दारूचे रसायन नष्ट करून एका जणाविरूध्द गुन्हा दाखल करून त्यास गजाआड करण्यात आले. 

वेरूळ ग्रामपंचायत असलेल्या शार्दूलवाडी परिसरातील माटेगाव धरण परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून काहीजण गावठी हातभट्टी दारूचा अड्डा चालवत होते. तसेच याच ठिकाणी दारूची विक्री केली जात असल्याने शार्दूलवाडी येथील अनेक लहाण, मोठे जण व्यसनाधीन झाले. यामुळे गावात व घराघरात भांडणे सुरू झाल्याने गावातील महिलांनी हा अड्डा बंद करावा यासाठी सोमवारी खुलताबाद पोलीस स्टेशन गाठून कैफियत मांडली होती. 

आज खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार वाल्मीक कांबळे, हनुमंत सातपुते, मगरे यांनी माटेगाव धरणाजवळील गावठी  हातभट्टी अड्ड्यावर छापा मारला. यावेळी  8 हजार 750 रूपये किमंतीचे दारू बनविण्याचे दोनशे लीटर रसायन नष्ट केले व दारू अड्डा उध्वस्त केला. याप्रकरणी  हातभट्टी चालक शिवाजी नाना मिसाळ (27) यास ताब्यात घेऊन त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान खुलताबाद पोलीसांच्या कारवाईमुळे शार्दूलवाडी येथील महिलांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :raidधाडPoliceपोलिसalcohol prohibition actदारुबंदी कायदा