शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयामधील रिक्त पदे भरण्याबाबतचा रोड मॅप सादर करा; खंडपीठाचे शासनाला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 17:21 IST

खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील वर्ग १ ते ४ मधील रिक्त पदे त्वरित भरण्याची विनंती जनहित याचिकेद्वारे केली आहे.

ठळक मुद्देजनहित याचिकेवर शुक्रवारी पुढील सुनावणीदीर्घ काळापासून २०४८ रिक्त पदे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामधील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली याची माहिती (रोड मॅप)घेऊन पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने बुधवारी राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले.

खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील वर्ग १ ते ४ मधील रिक्त पदे त्वरित भरण्याची विनंती जनहित याचिकेद्वारे केली आहे. याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वरील निर्देश दिले. याचिकेवर शुक्रवारी (दि.१८) पुढील सुनावणी होणार आहे .खा. जलील यांनी निदर्शनास आणून दिले की, घाटीतील सुपर स्पेशालिटी वॉर्डाची सुमारे १५० कोटी रुपये खर्च करून बांधलेली इमारत तयार असून कॅथलॅब व ६ शस्त्रक्रियागार तयार असून तज्ज्ञ डॉक्टरांअभावी या वॉर्डात एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. विशेष म्हणजे शासनाने मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय येथील हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. आशिष भिवापूरकर यांची २०१७ ला घाटीत नियुक्ती केली होती. ते एप्रिल २०१८ ला येथे रुजू झाले; मात्र मागील तीन वर्षांत त्यांनी एकही हृदयशस्त्रक्रिया केलेली नाही. परंतु मासिक पगारापोटी दरमहा २ लाख ५३ हजार ५५४ रुपये डॉ. भिवापूरकर यांनी घाटीतून उचललेले आहेत. यासंदर्भात अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने खा. जलील यांना दिले. तसेच सरकारी वकिलांना याबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले.

वर्ग १ व २ ची पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत असली तरी सद्यस्थितीत रुग्णसंख्या वाढली असताना किमान वर्ग ३ व् ४ ची पदे जी अनेक वर्षांपासून रिक्त आहेत ती तरी पदे त्वरित भरावीत, अशी मागणी खा. जलील यांनी केली. सुनावणीवेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर उपस्थित होत्या. केंद्राकडून असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार, राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे व सहायक सरकारी वकील सुजीत कार्लेकर यांनी काम पाहिले.

दीर्घ काळापासून २०४८ रिक्त पदेखा.जलील यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात दीर्घ काळापासून एकूण २०४८ पदे रिक्त आहेत. त्यापैकी घाटी रुग्णालयात ८६८, घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी वॉर्डात २१९, महापालिकेच्या रुग्णालयात ८३, जिल्हा परिषदेच्या रुग्णालयात ३३०, शासकीय कर्क रुग्णालयात १२२, शासकीय कर्क रुग्णालयाच्या एक्स्टेंशन बिल्डिंगमध्ये ३६४, चिकलठाणा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ६० पदे रिक्त आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठMedicalवैद्यकीयgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी