शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

'मनरेगा' प्रकरणात आठ आठवड्यात अंतिम अहवाल सादर करा; खंडपीठाचे बीडच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 13:41 IST

MGNREGA Corruption Case of Beed : राजकुमार देशमुख यांनी बीड जिल्ह्यात २०११ ते २०१९ या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याबाबत ॲड. जी. के. नाईक यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देपूर्वीचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनीही खंडपीठाने त्यांच्याबाबत दिलेल्या आदेशात सुधारणा करण्याची विनंती करणारा अर्ज सादर केलाजानेवारी २०२१ मध्ये उच्च न्यायालयाने जिल्हाभरात झालेल्या कामांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या गैरव्यवहाराच्या चाैकशीचा प्रगती अहवाल ४ आठवड्यात आणि अंतिम अहवाल ८ आठवड्यात सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. एस. एन. मेहरे यांनी बुधवारी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ( Submit final report in MGNREGA case within eight weeks; Instructions of the bench to the new Collector) 

बीडचे पूर्वीचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनीही खंडपीठाने त्यांच्याबाबत दिलेल्या आदेशात सुधारणा करण्याची विनंती करणारा अर्ज बुधवारी सादर केला. जगताप यांच्या अर्जावर पुढील आठवड्यात तर मूळ प्रकरणावरील सुनावणी २० सप्टेंबर राेजी हाेणार आहे. बीडचे नूतन जिल्हाधिकारी शर्मा सुनावणीदरम्यान उपस्थित हाेते, अशी माहिती मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी दिली आहे.

राजकुमार देशमुख यांनी बीड जिल्ह्यात २०११ ते २०१९ या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याबाबत ॲड. जी. के. नाईक यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणी दरम्यान जानेवारी २०२१ मध्ये उच्च न्यायालयाने जिल्हाभरात झालेल्या कामांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते; मात्र वेळेत कारवाई न झाल्याचे स्पष्ट करत २ ऑगस्ट रोजी न्यायालयाने बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या बदलीचे आदेश दिले होते. पुढील सुनावणीच्या वेळी नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी अहवालासह उपस्थित राहण्याच्या सूृचना केल्या होत्या. त्यानुसार राज्य शासनाने बीड जिल्हाधिकारीपदी राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडBeedबीड