शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

समर्थनगरातील चोरीतील मुद्देमाल केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 22:55 IST

गुन्हे शाखेने समर्थनगरातील घरफोडीप्रकरणी दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या मामा-भांजे टोळीने बुलडाणा जिल्ह्यातील दोन गावांत लपविलेले सोने पोलिसांना काढून दिले. त्या दोघांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल शिर्डीतून गुन्हे शाखेने ताब्यात घेतली असून, तीही चोरीची असल्याचे समोर आले. समर्थनगरातील व्यंकटेश अपार्टमेंटमधील रहिवासी बँकेच्या अधिकारी सुनीता पुराणिक यांची सदनिका फोडून ५० तोळे दागिने व रोख असा एकूण १६ लाखांचा ऐवज पळविला होता.

ठळक मुद्देशिर्डीतून आणली गुन्ह्यातील मोटारसायकल : एकाने घराच्या पडक्या खोलीत आणि दुसऱ्याने शेतात लपविले होते सोने

औरंगाबाद : गुन्हे शाखेने समर्थनगरातील घरफोडीप्रकरणी दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या मामा-भांजे टोळीने बुलडाणा जिल्ह्यातील दोन गावांत लपविलेले सोने पोलिसांना काढून दिले. त्या दोघांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल शिर्डीतून गुन्हे शाखेने ताब्यात घेतली असून, तीही चोरीची असल्याचे समोर आले.समर्थनगरातील व्यंकटेश अपार्टमेंटमधील रहिवासी बँकेच्या अधिकारी सुनीता पुराणिक यांची सदनिका फोडून ५० तोळे दागिने व रोख असा एकूण १६ लाखांचा ऐवज पळविला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने किरण सोपान चव्हाण, कर्मा प्रकाश पवार, किशोर वायाळ आणि राजू इंगळे (बुलडाणा) या मामा-भांजेच्या टोळीला अटक केली होती.कोठडीदरम्यान वायाळ व इंगळे यांनी गुन्ह्याची कबुली देऊन सोने काढून देण्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन दोन पोलीस पथके बुलडाण्याच्या दिशेने रवाना झाली होती. चोरीतील ऐवज चोरट्यांनी वाटे हिस्से करून वाटून घेतला होता. चोरट्यांनी हा ऐवज जमिनीत सुरक्षित पुरून ठेवला होता. एकाने पडक्या घरातून तर दुसºयाने शेतातून ऐवज पोलिसांना काढून दिला आहे. हा ऐवज घेऊन पोलीस पथक मंगळवारी सायंकाळी औरंगाबादकडे निघाले. त्यामुळे नेमका किती ऐवज पोलिसांच्या हाती लागला हे, समजू शकले नाही.गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही चोरीचीजबरी हात मारून ज्या दुचाकीवरून चोरटे पसार झाले होते, ती दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. वायाळ आणि इंगळे याने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून तीदेखील चोरीचीच असल्याचे निष्पन्न झाले, असे गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. टीमने शिर्डी येथे जाऊन मंगळवारी दुचाकी आणली आहे. ती कोठून चोरली, याचा आता तपास सुरू आहे.दोन टीमने बुलडाण्यातून चोरीचा माल केला जप्तसहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, गजानन मांटे, विशाल सोनवणे, प्रभाकर राऊत, सुनील धात्रक यांच्या पथकाने आणि उपनिरीक्षक आफरोज शेख यांच्या पथकातील सुभाष शेवाळे, गजेंद्र शिंगाणे, सुधाकर राठोड, आश्रफ सय्यद, सिद्धार्थ थोरात, नितीन धुळे आदींनी चोरट्यांकडून माल हस्तगत केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस