शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

मिटमिट्यातील हायवे लगतच्या शाळेने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 16:55 IST

मुले-मुली शाळेतून सुखरूप घरी येईपर्यंत मिटमिट्यातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. वर्षातून एकदा, दोनदा तरी एखाद्या विद्यार्थ्याला वाहन अपघातात जिवाला मुकावे लागते.

औरंगाबाद : मुले-मुली शाळेतून सुखरूप घरी येईपर्यंत मिटमिट्यातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. वर्षातून एकदा, दोनदा तरी एखाद्या विद्यार्थ्याला वाहन अपघातात जिवाला मुकावे लागते. यास कारण ठरते ती हायवे लगतची शाळा. शाळा भरताना व सुटताना कधी अपघाताची घटना घडेल याचा नेम नसल्याने गावकर्‍यांना सतत धास्ती असते. गावातील सुरक्षित स्थळी शाळेचे स्थलांतर करण्यात यावे, ही मागील २० वर्षांपासूनची गावकर्‍यांची मागणी. मात्र, शाळेऐवजी शहरातील कचरा गावाच्या डोक्यावर आणून टाकण्याचा घाट ‘मनपा’ने घातला होता. यामुळेच मिटमिटावासीयांचा संयमाचा बांध फुटला. 

औरंगाबाद-नाशिक महामार्गालगत अनेक गावे वसलेली आहेत. त्यातीलच एक मिटमिटा. येथील महानगरपालिकेचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हायवेलगतच आहे. ही शाळा मिटमिटावासीयांच्या हृदयाचे ठोके वाढविण्यास कारणीभूत ठरते आहे. या महामार्गावरून २४ तास जडवाहने वेगात असतात.इयत्ता बालवाडी ते दहावीपर्यंतचे ६२० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. शाळेच्या समोर ५ ते १० फुटांची मोकळी जागा म्हणजे या शाळेचे मैदान होय. यावरून शाळेच्या बिकट परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. पेव्हर ब्लॉक बसविलेल्या या जागेतच दुचाकी पार्किंग केल्या जातात व तेवढ्याच जागेत विद्यार्थी मधल्या सुटीत डब्बा खातात. हायवेवरून धावणारे जडवाहन कधी अनियंत्रित होईल व शाळेच्या ओट्यावर येईल याचा नेम नाही. 

सकाळी सहावी ते दहावी व बालवाडीचे विद्यार्थी तर दुपारी पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. शाळा भरताना व सुटताना विद्यार्थ्यांना गावात जाण्यासाठी हायवे ओलांडावा लागतो. शाळा सुटली की  विद्यार्थ्यांना पहिले महामार्गालगत उभे केले जाते. महामार्गाच्या दोन्ही बाजूला शिक्षक-शिक्षिका उभ्या राहतात व दोन्ही बाजूंची वाहने थांबवितात. मग विद्यार्थ्यांना महामार्गाच्या दुसर्‍या बाजूस सोडण्यात येते. अनेकदा वाहनधारक शिक्षकांचे ऐकत नाहीत व विद्यार्थी रस्ता ओलांडत असतानाही भरधाव वाहने दामटली जातात. शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी हिवाळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना जीव मुठीत ठेवून रस्ता ओलांडावा लागतो. सर्व विद्यार्थ्यांनी रस्ता ओलांडला की शिक्षकांचा जीव भांड्यात पडतो. शाळा भरताना व सुटल्यावर प्रत्येकाच्या मनात धडकी भरते. शाळेचे स्थलांतरण करणे आवश्यक आहे. 

शाळेचे स्थलांतर करावेमिटमिटालगत २५० एकर गायरान जमीन आहे. ही जमीन सफारीपार्कसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. येथील ५ एकर जागा मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी उपलब्ध करून द्यावी. मनपाने त्यासाठी येत्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद करावी. मागील २० वर्षांपासून आम्ही शाळा स्थलांतराची मागणी करीत आहोत; पण नेहमी दुर्लक्ष करण्यात आले. दरवर्षी शाळेसमोर अपघात होतात. काही विद्यार्थ्यांचा बळी त्यात गेला आहे. मनपा आणखी किती विद्यार्थ्यांचे बळी घेणार आहे. आता तरी मनपाचे आयुक्त, अधिकारी व नगरसेवकांनी जागे व्हावे. - लक्ष्मण बनकर, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, मिटमिटा