शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची ‘आॅनलाईन’ भरारी!; औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकाला वर्षभरात ४ कोटी ७० लाखाचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 16:10 IST

माहिती व तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा एसटी महामंडळालाही फायदा झाला असून, आॅनलाईन रिझर्व्हेशन पद्धतीतून महामंडळाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत.

ठळक मुद्देप्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने पुढचे पाऊल टाकत आॅनलाईन रिझर्व्हेशन सिस्टिम (ओआरएस) ही यंत्रणा कार्यान्वित केली.

- राजेश भिसे

औरंगाबाद : माहिती व तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा एसटी महामंडळालाही फायदा झाला असून, आॅनलाईन रिझर्व्हेशन पद्धतीतून महामंडळाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. यातून औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकाला वर्षभरात ४ कोटी ७० लाखांचे उत्पन्न  मिळाले आहे. माहिती व तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले तसतशा सुविधाही आॅनलाईन पद्धतीने सुरू झालेल्या आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने पुढचे पाऊल टाकत आॅनलाईन रिझर्व्हेशन सिस्टिम (ओआरएस) ही यंत्रणा कार्यान्वित केली.

महामंडळाच्या मोबाईल अ‍ॅप आणि इंटरनेट वेबसाईटमुळे राज्याच्या कोणत्याही भागातून आरक्षणाची नोंदणी करणे प्रवाशांना सुकर झाले. आॅनलाईन रिझर्व्हेशनमधून एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात ४ कोटी ६९ लाख ९५ हजार १६६ रुपयांचे उत्पन्न औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकाला मिळाले आहे, तर याच काळात ९८ हजार ७८८ प्रवाशांनी या पद्धतीने आरक्षण नोंदणी केल्याचे आकडेवारीवरून दिसते. औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिकसह गुलबर्गा, विजापूर, इंदूर, ब-हाणपूर, अहमदाबाद, निजामाबाद या गावांसाठी आंतरराज्य बससेवा दिली जाते. या बसच्या प्रवाशांमधून आॅनलाईन रिझर्व्हेशन नोंदणी अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून येते.

शिवनेरी, शिवशाही, निमआराम या बसच्या आसन आरक्षण नोंदणीस प्रवाशांचे प्राधान्य असते. स्थानकांच्या महिन्याच्या उत्पन्नापैकी दहा टक्के वाटा आॅनालाईन आरक्षण नोंदणीतून मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मे २०१८ या महिन्यात ११ हजार ७४४ प्रवाशांनी आॅनलाईन पद्धतीने नोंदणी केली असून, यापोटी महामंडळाला ५५ लाख ७५ हजार ३५६ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 

तालुकास्तरावर प्रतिसाद नाही...एसटी महामंडळाच्या आॅनलाईन रिझर्व्हेशन पद्धतीत लांब पल्ल्याच्या बसमध्ये आरक्षण करणाºयांचे प्रमाण अधिक आहे. जिथे बससेवेची वारंवारता अधिक आहे तेथे आरक्षण नोंदणीस तुलनेने कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. याला पुणे शहर अपवाद ठरते. तालुकास्तरावर प्रवाशांचा आॅनलाईन आरक्षण नोंदणीस प्रतिसाद कमीच मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

वातानुकूलित बससेवेमुळे प्रवासी वाढले ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन एसटी महामंडळ काम करीत आहे. खाजगी वाहनांशी स्पर्धा करतानाच प्रवाशांसाठी अधिकाधिक अ‍ॅप, वेबसाईट या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. वातानुकूलित बससेवेमुळे प्रवासी भारमान वाढले आहे. - प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, औरंगाबाद.

लांबपल्ल्याच्या सेवेस अधिक प्रतिसाद औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून राज्याच्या महत्त्वाच्या शहरांसह आंतरराज्य बससेवा दिली जाते. लांबपल्ल्याच्या सेवेस अधिक प्रतिसाद मिळत आहे. एसटीचा अ‍ॅप, खाजगी अ‍ॅप व वेबसाईटचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. याची परिणती उत्पन्न वाढण्यात दिसून येते.- अमोल भुसारी, आगारप्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक, औरंगाबाद.

टॅग्स :state transportएसटीAurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकAurangabad Cidco Bus Standऔरंगाबाद सिडको बसस्थानकpassengerप्रवासी