शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

सिडको उड्डाणपुलाचे ‘स्ट्रक्चर’च बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 00:39 IST

विकास राऊत, औरंगाबाद सिडको, वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलाचा अग्रसेन चौकाच्या बाजूने काढण्यात आलेल्या उतारामुळे तो पूल अतिशय धोकादायक होण्याची दाट शक्यता आहे.

विकास राऊत, औरंगाबादमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या सिडको, वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलाचा अग्रसेन चौकाच्या बाजूने काढण्यात आलेल्या उतारामुळे तो पूल अतिशय धोकादायक होण्याची दाट शक्यता आहे. त्या पुलाचे स्ट्रक्चर बदलल्यामुळे पुलाचा कोर्टाच्या दिशेने उतार वाढला आहे. लोकमतने तज्ज्ञ अभियंत्यांना घेऊन केलेल्या पाहणीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुलाची लांबी वाढवून मिळण्याच्या अपेक्षेपोटी कंत्राटदाराने त्याचे काम वर्षभर लटकवून ठेवले, उतारासाठी वाढीव कॉलमही घेऊन ठेवले; परंतु लांबी वाढविण्यासाठी ३५ कोटी न देण्याचा शासन निर्णय होताच, आहे त्या अवस्थेत ‘अर्थवर्क’ (भराव काम) पूर्ण करण्याच्या दिशेने कंत्राटदाराने पाऊल उचलले. याकडे रस्ते विकास महामंडळाने पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून, औरंगाबादकरांच्या नशिबी आणखी एक अपघाती पूल आलाआहे. पुलाचे डिझाईन ‘एस’आकारामध्ये पुलाचे पूर्ण डिझाईन पाहिले तर ते ‘एस’ आकाराचे झालेआहे. अग्रसेन चौक ते सान्या मोटार्सपर्यंत या पुलाचे डिझाईन पाहिले तर ‘एस’ आकारामध्ये टॉप ते बॉटम असा तो पूल दिसतो. नागमोडी वळणामुळे या पुलावरून वेगाने वाहने जाणे धोकादायक ठरणार आहे. लांबी न वाढविल्यामुळे बदलला निर्णयसिडकोतील उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडून स्थगित केल्यामुळे कंत्राटदार, काही लोकप्रतिनिधींच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. त्या पुलाची लांबी ३०० मीटरने वाढवावी, असे पत्र महापालिकेने रस्ते विकास महामंडळाला दिले होते.रस्ते विकास महामंडळानेदेखील शासनाकडे पाठपुरावा करून ३५ कोटींतून ३०० मीटर लांबी वाढवून मिळावी यासाठी प्रयत्न केला. कंत्राटदाराने यासाठी स्थानिक राजकारण्यांना पायघड्या घातल्या होत्या.काय आढळून आले पाहणीमध्ये?लोकमतने केलेल्या पाहणीत आढळून आले की, पुलाचे सिव्हिल वर्क जेथून संपले, तेथून जेथे लँडिंग होत आहे, त्यापर्यंत लांबीच्या तुलनेत जास्त उतार हवा होता. उतार काढण्यात मोठा फरक असल्यामुळे वाहन उतरताना थेट स्पीडने खाली येईल. पुलाच्या एकूण उंचीनुसार जेवढा उतार हवा होता, तेवढा नसल्यामुळे तो पूल अपघाती पूल ठरू शकतो.