शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
2
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
3
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
4
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
5
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
6
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
7
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
8
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
9
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
10
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
11
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
12
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
13
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
14
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
15
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
16
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
17
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
18
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
19
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'

रस्ता रुंदीकरण मोहिमेस आंबेडकरनगरात जोरदार विरोध; मागण्या मान्य होताच कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:43 IST

बाधित मालमत्ताधारकांचे पंतप्रधान आवास योजनेत पुनर्वसन करणार

छत्रपती संभाजीनगर : रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत महापालिका, पोलिसांचे पथक मंगळवारी दुपारी २:३० वाजता जळगाव रोडवर आंबेडकरनगरात दाखल झाले. या पथकाला महिला, पुरुष, तरुण आणि काही राजकीय नेत्यांनी कडाडून विरोध केला. बाधित मालमत्ताधारकांचे पुनर्वसन, बुद्ध विहार, विहारासमोरील कमान बांधून देण्याचे आश्वासन मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले. त्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर सायंकाळी ५:०० वाजता या भागात कारवाईला हळुवार सुरुवात झाली. बाधित व्यावसायिक मालमत्ता ७:०० वाजेपर्यंत पाडण्यात आल्या.

जळगाव रोड ६० मीटर (२०० फूट) रुंद आहे. त्यादृष्टीने नगररचना विभागाने मार्किंग केली होती. बहुतांश मालमत्ताधारकांनी बाधित भागातील सामान काढून घेतले होते. मंगळवारी सकाळी ११:३० वाजता हर्सूल टी पॉईंट येथून कारवाईला सुरुवात झाली. पथक दुपारी २:३० वाजता आंबेडकरनगर चौकात दाखल झाले. प्रारंभी मार्किंग चुकीची असल्याचा आरोप झाला. मनपाने परत एकदा मार्किंग केली. हजारो नागरिकांची येथे गर्दी जमली होती. महिला, पुरुषांनी कारवाईला विरोध केला. माजी नगरसेवक अमित भुईगळ, अरुण बोर्डे यांनीही मनपा अधिकाऱ्यांकडे पुनर्वसन, विहार, विहारासमोरील कमान बांधून देण्याची मागणी केली. हळूहळू तणाव वाढत गेला. पोलिसांचे विशेष पथकही या भागात सक्रिय झाले. ड्रोनद्वारे संपूर्ण घटनेचे चित्रीकरण सुरू झाले. बघ्याची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच मनपा प्रशासक जी. श्रीकांत घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर लगेच पोलिस आयुक्त प्रवीण पवारही आले. त्यांनी राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत संवाद साधला. त्यानंतर तणाव निवळला.

आणीबाणी कायद्याचा वापरमनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी आंबेडकरनगरातील बुद्ध विहाराचा भाग, प्रवेशद्वार नव्याने बांधून देण्याचे आश्वासन दिले. आणीबाणी कायद्यानुसार (६७-३ सी) हे काम विनानिविदा करण्यात येईल, असे जाहीर केले. रस्त्यात बाधित होणाऱ्यांचे पंतप्रधान आवास योजनेत पुनर्वसन करण्यात येईल, मोहीम थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

एका जेसीबीने कारवाईसायंकाळी ५:०० वाजता आंबेडकरनगर चौकात एका मालमत्तेला जेसीबी लावण्यात आला. ही मालमत्ता संथ गतीने पाडण्याचे काम सुरू होते. नंतर वेग वाढविण्यात आला. व्यावसायिक मालमत्ताच पाडण्यात आल्या. निवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंत मुभा दिलेली आहे. काळा गणपती मंदिरापर्यंत कारवाई करण्यात आली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण