शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा; ६ दिवसांत ६३ गावांवरील ढगांत कृत्रिम पावसाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 11:53 IST

पाणीदार ढगांत जाळल्या ८९ नळकांड्या  

ठळक मुद्देमराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत प्रयोगरविवारी केला अहमदनगर, बीड जिल्ह्यांत प्रयोग 

औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी प्रयत्न केले जात असले तरी त्यातून खूप काही हाती लागत नसल्याचे चित्र सध्या तरी आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत सहा दिवसांत प्रयोगासाठी विमानाने उड्डाण करीत रसायनांची फवारणी केली. आजवर ६३ गावांवरील पाणीदार ढगांत रसायनांच्या ८९ नळकांड्या जाळण्यात आल्या. 

पावसासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असून, अजून दखलणीय पाऊस प्रयोगातून झालेला नाही. २० आॅगस्ट रोजी घनसावंगी तालुक्यात ढगांवर फवारणी करण्यात आली होती. त्यानुसार येथे पाऊस झाल्याचा दावा प्रशासनाने केला. २१ आॅगस्ट रोजी अंबड तालुक्यातील रुई, बाबा दर्गा घनसावंगी, पराडा (ता. अंबड), तनवाडी (ता. घनसावंगी), गुरुप्रिंप्री (घनसावंगी), पीरगाऊबवाडी (घनसावंगी), ममदाबाद (जालना), करला (जालना), खोदेपुरी (जालना), भिलपुरी (जालना), खोरदगाव (पाथर्डी, अहमदनगर), मोहरी (पाथर्डी, अहमदनगर), पाथर्डी, वासू (पाथर्डी), अमरापूर (शेगाव, अहमदनगर), अशा १९ ठिकाणी ३८ नळकांड्यांतून फवारणी करण्यात आली. या १९ ठिकाणांपैकी काही ठिकाणी दोन वेळा फवारणी करण्यात आली आहे. विमानाने सायंकाळी ३ वाजून ५६ मिनिटांनी उड्डाण घेतले आणि हे विमान ५ वाजून ५० मिनिटांनी औरंगाबाद विमानतळावर उतरले. २२ आॅगस्ट रोजी मांडू तांडा, गोंदी, पिंपरखेड (ता. अंबड), मांडला (जालना), माखणी (गंगाखेड, जि. परभणी), पुष्पनगर, बारभाई तांडा, केसापुरी, शाजानपूर, (माजलगाव, जि. बीड), मैनदा (बीड), किनगाव व भाटेपुरी (गेवराई) आणि बीड शहरात विमानाच्या माध्यमातून ढगात रसायनांची फवारणी करण्यात आली. 

२३ आॅगस्ट रोजी ५ वाजून ५ मिनिटांनी सी-९० या विमानाने कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी उड्डाण घेतले. ६.३० वा. विमान विमानतळावर उतरले. दोन नळकांड्या ढगांत जाळण्यात आल्या. परभणी जिल्ह्यातील सेलू, पर्डी या परिसरात प्रयोगासाठी प्रयत्न झाले. रडारच्या माध्यमातून पाणीदार ढगांची माहिती मिळाल्यानंतर वैमानिकाने उड्डाण घेत फवारणी केली.  

रविवारी केला अहमदनगर, बीड जिल्ह्यांत प्रयोग २५ आॅगस्ट रोजी रविवारी ३ वाजून ५ मिनिटांनी सी-९० हे विमान प्रयोगासाठी उडाले. ६ वाजून २ मिनिटांनी ते विमानतळावर उतरले. आज ३४ (नळकांड्या) फ्लेअर्स ढगात सोडण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील खासपुरी, पाथर्डी, शिरळ, तीसगाव, गोलेगाव, शेवगाव, घायतकवाडी, बीड जिल्ह्यातील पिंपळनेर, रायमोह, शिरूर, मालकाची वाडी, शिरापूर, उम्रद जहागीर, बीड शहर, अंबेवडगाव, धारूर, बावी, वडवणी, काठोडा येथे प्रयोग केला. २४ रोजी ३ वाजून २६ मिनिटांनी सी-९० विमान प्रयोगासाठी आकाशात झेपावले. ५.४२ वा. ते विमान खाली उतरले. १५ हायड्रोस्कोपिक फ्लेअर्स जाळण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील भानाशिवार, नेवासा, शिंंगोरी, शेवगाव, पेमगिरी, संगमनेर, बीड जिल्ह्यातील नाळवंडी, पाटोदा, आंबेवाडी, आष्टी, हतकरवाडी येथे प्रयोग केला. रविवारी त्या भागत पाऊस झाल्याच्या नोंदी आहेत.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाBeedबीड