शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्रा पिसाळला; सिडको एन-७ परिसरात तोडले १४ जणांचे लचके

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 19:43 IST

मनपा पथकाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

छत्रपती संभाजीनगर : एन-७ सिडको, मुकुल मंदिर शाळा परिसर, सिडको पोलिस स्टेशन परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास १४ जणांचे लचके तोडल्याची घटना रविवारी दुपारी ४ ते सायंकाळी ७:३० वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. या मोकाट कुत्र्याला कोंडण्यासाठी मनपाच्या पथकाशी संपर्क साधल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

या मोकाट कुत्र्याच्या हल्ल्याचा एक व्हिडीओही समाेर आला. सायंकाळी ७:३० वाजेचा हा व्हिडीओ आहे. दोन तरुण एका गल्लीत उभे आहेत व ज्येष्ठ पायी जात आहेत, समोरून आलेल्या मोकाट कुत्र्याने अचानक या ज्येष्ठ नागरिकावर हल्ला केला, असे यात दिसते. ज्येष्ठ नागरिकाच्या चेहऱ्यावर आणि हाताचे मोकाट कुत्रा लचके तोडतो. यावेळी अन्य नागरिक धाव घेतात. त्यामुळे मोकाट कुत्र्यापासून ज्येष्ठ नागरिकाची सुटका होते. अशाच प्रकारे परिसरातील अन्य लोकांवर या कुत्र्याने हल्ला केल्याचे नागरिकांनी सांगितले. काही घाटी रुग्णालयात, तर काहींनी परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली.

घाटीत यांच्यावर उपचारघाटी रुग्णालयात रात्री ९ वाजेपर्यंत अमोल भूल, रुद्र शेळके, शिवाजी राठोड, शुभम घुसे, ज्ञानेश्वर बेंद्रे, प्रवीण हिवाळे, हिम्मत सोमखाल हे उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली.

...म्हणे आज रविवार, सकाळी येतोएन-७, सिडको, मुकुल मंदिर शाळा परिसर, सिडको पोलिस स्टेशन परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास १४ जणांना चावा घेतला. डॉग व्हॅनला तक्रार केली असता आज रविवार आहे, आमच्याकडे कर्मचारी नसल्यामुळे आम्ही येऊ शकत नाही, सकाळी येतो, असे सांगण्यात आले; परंतु मुकुल मंदिर शाळा ही सकाळी ७ वाजता भरते व शाळेमध्ये साडेतीनशे ते चारशे विद्यार्थी आहेत. जर त्या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले नाही, तर खूप मोठा धोका संभवतो. मी स्वतः मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांना फोन केला; परंतु त्यांनी फोन घेतला नाही. त्यांना मेसेज केला आहे. मनपाच्या श्वान पथकाच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही फोन केला; पण त्यांनी फोन घेतला नाही आणि माझा नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला.- रवींद्र तांगडे

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरdogकुत्रा