शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

गुळगुळीत सिमेंट रस्ता केला, पुन्हा उखडून फेकला; छत्रपती संभाजीनगर मनपाचे अजब काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:02 IST

कोट्यवधी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असताना मनपा अधिकारी अजिबात फिरकत नाहीत. कंत्राटदार आपल्या मनानुसारच काम करतो.

छत्रपती संभाजीनगर : शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून गुळगुळीत सिमेंट रस्ते करण्यात येत आहेत. या कामांच्या गुणवत्तेबाबत ओरड झाली, तरी अधिकारी, कर्मचारी लक्ष द्यायला तयार नाहीत. जालना रोडवर एसएफस शाळेसमोरील बसय्यैनगर-व्यंकटेशनगर येथील सिमेंट रस्ता महापालिकेने अचानक खोदून ठेवला. खोदलेला सिमेंटचा मलबाही तसाच पडून असल्याने वाहनधारकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

ॲपेक्स हॉस्पिटलसमोरील रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था होती. महापालिका प्रशासनाने आठ महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेतला. ६० लाखांहून अधिक खर्चाच्या कामाची निविदा काढली. बालाजी कन्सट्रक्शनला काम देण्यात आले. कंत्राटदाराने सात महिन्यांपूर्वी कामही केले. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी या भागात अन्य एका कामाच्या पाहणीसाठी गेले, तेव्हा या रस्त्याचा सरफेस खराब झाल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी त्वरीत जेवढा खराब पॅच आहे, तो खोदून नव्याने करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला दिले. कंत्राटदाराकडून बऱ्याच दिवसांपासून चालढकल करण्यात येत होती. शेवटी सोमवारी रस्त्याचा काही भाग खोदून काढण्यात आला. खोदण्यात आलेला मलबाही उचलण्याची तसदी संबंधित कंत्राटदाराने घेतली नाही. त्यामुळे वाहनधारकांना बराच त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

सरफेस खराब झालेच कसे?कोट्यवधी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असताना मनपा अधिकारी अजिबात फिरकत नाहीत. कंत्राटदार आपल्या मनानुसारच काम करतो. रस्त्याचा सरफेस खराब झाला म्हणजे शेड्युल बी-नुसार ठरलेले मटेरियल वापरण्यात आले नाही. गुणवत्ता अधिकाऱ्यांनी तपासणी केली नाही. प्रशासक किंवा अन्य अधिकाऱ्यांनी हा रस्ता बघितला नसता, तर कंत्राटदाराला रस्ता खोदण्याची वेळच आली नसती.

काय म्हणाले अधिकारीॲपेक्स हॉस्पिटलसमोरील रस्त्याचा काही भाग खराब आहे. कंत्राटदाराला काढून नव्याने करण्याचे आदेश दिले. ही नियमित प्रक्रिया आहे. लवकरच काम पूर्ण होईल. संबंधित कामाची मुदत संपलेली नव्हती.- बी. डी. फड, कार्यकारी अभियंता मनपा.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका