शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! शिवाजीनगर भुयारी मार्गात पाण्याचा निचरा होईना, आता वरून टाकणार पत्र्याचे छत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:58 IST

पाणी निचरा होण्याचा मार्ग योग्य पद्धतीने करण्यात आला नसल्यानेच हा भुयारी मार्ग पावसात तुंबत आहे.

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर भुयारी मार्गात गेल्या दोन महिन्यात दोनवेळा पाणी साचले. पाणी निचरा होण्याचा मार्ग योग्य पद्धतीने करण्यात आला नसल्यानेच हा भुयारी मार्ग पावसात तुंबत आहे. मात्र, पाणी निचरा होण्याच्या कामाऐवजी भुयारी मार्गावर पत्रे बसवण्याचा प्रयोग केला जात आहे. हा प्रकार म्हणजे ‘आजार म्हशीला अन् इंजेक्शन पखालीला’ अशी ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.

शिवाजीनगर भुयारी मार्गाचे १५ फेब्रुवारी रोजी लोकार्पण करण्यात आले. मात्र, शहरात १८ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने शिवाजीनगर येथील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि भुयारी मार्गाची पोलखोल झाली. यानंतर रेल्वे प्रशासनासह अन्य यंत्रणांनी युद्धपातळीवर भुयारी मार्गाच्या ठिकाणी पाणी निचरा होण्यासंबंधी काम केले. परंतु, त्यानंतरही १२ जुलै रोजी पुन्हा या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचल्याने ये-जा करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. पाणी निचरा होण्यासंबंधी काम करण्याऐवजी भुयारी मार्गावर पत्रे बसवण्याचा जुगाड केला जात असल्याने आणि त्यासाठी भुयारी मार्गातील वाहतूक बंद ठेवली जाणार असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

शहानूरमियाँ दर्गा चौकात खोळंब्याची शक्यतापाच दिवस शिवाजीनगर भुयारी मार्ग बंद राहणार असल्याने नागरिकांना संग्रामनगर उड्डाणपूल, शहानुरमियाँ दर्गा चौकातून वळसा मारावा लागणार आहे. परिणामी, एकाच चौकावर वाहनांचा भार पडणार असून, येथील वाहतूक खोळंबा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

कामासाठी भुयारी मार्ग बंद करू नयेपत्रे बसवण्याच्या कामासाठी भुयारी मार्ग बंद करता कामा नये. विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय होईल. पत्रे बसवल्यानंतर पाणी साचते की नाही, हे पुढे समोर येईलच. परंतु, हे काम रात्रीही करता येईल. दोन ते तीन दिवसात काम पूर्ण करावे.- बद्रीनाथ थोरात, अध्यक्ष, सातारा-देवळाई जनसेवा कृती समिती

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरTrafficवाहतूक कोंडी