शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीत अजब प्रकार;सेवा निवृत्तीनंतरही ‘अभियंता’ येतोय ड्युटीवर,व्हॉट्सॲप ग्रुपमध्येही ॲक्टीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 13:45 IST

महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र गळ्यात घालून वावरतात. प्रशासनाने त्यांना मुदतवाढ दिल्याचा समज अनेेकांचा झाला.

- बापू सोळुंके

औरंगाबाद: गंगापूर पंचायत समितीतून दोन महिन्यापूर्वी निवृत्त झालेला स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आजही सरकारी बांधकाम साईटला नियमित भेटी देत फिरतो आहे. शासकीय कागदपत्राच्या फाईल्स सोबत बाळगणे, एवढेच नव्हे तर साईटला भेट दिल्याची छायाचित्रेही तो कार्यालयीन व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करतो आहे.

शेख इकबाल हे अभियांत्रिकी सहायक म्हणून गंगापूर पंचायत समितीत कार्यरत होते. त्यांच्याकडे काही दिवस शाखा अभियंत्याचा पदभार होता. ३१ जानेवारी रोजी ते निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांना सरकारी कामाचा लळा कायम आहे. गंगापुर पंचायत समितींतर्गत शामाप्रसाद मुखर्जी रूरलर्बन स्टडी सेंटरचे त्यांचे काम नियमित सुरू आहे. येथील इमारत बांधकामाला ते नियमित भेट देतात. ठेकेदार, सुपरवायझर आणि कामगारांना सूचना देतात.

व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲक्टीव्हइकबाल शेख हे जि.प. बांधकाम विभागांत कार्यरत होते. यामुळे या विभागाच्या सरकारी व्हॉटसॲप ग्रुपमध्ये ते होते. मात्र ते आताही या व्हॉटसॲप ग्रुपमध्ये ॲक्टीव्ह आहेत. जोगेश्वरीतील इमारत बांधकामाच्या साईटवरून काही साहित्य चोरीला गेले. याची पाहणीही त्यांनी वाळूज पोलिसांना सेाबत घेऊन केली. याविषयीचे छायाचित्रे त्यांनी रूरबन गाव समुह ग्रुपवर टाकले.

आयकार्ड घालून फिरतात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासकीय ओळखपत्र गळ्यात घालून वावरता येत नाही. मात्र हा नियम शेख इकबाल यांना लागू नाही. ते महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र गळ्यात घालून वावरतात. प्रशासनाने त्यांना मुदतवाढ दिल्याचा समज अनेेकांचा झाला.

कनिष्ठ अभियंत्याना त्यांची मदत होतेशेख इकबाल हे दोन महिन्यापूर्वी निवृत्त झाले. मात्र ते गंगापूर येथील शाखा अभियंत्याच्या मदतीसाठी त्यांच्यासोबत असतात. ते कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करीत नाही. शिवाय त्यांची बांधकाम विभागाला मदत होते.- कल्याण भोसले, प्रभारी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, जि.प.

ठेकेदाराकडे कामाला मी सेवानिवृत्त झाल्यानंतर रूलबनचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मला कामावर बोलावले आहे. ते मला चांगले मानधन देत असल्याने मी त्यांच्या साईटवर गेलो होतो. त्या साईटवरून साहित्य चोरीला गेले होते. त्याचे छायाचित्रे ग्रुपवर टाकली. मी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक असल्याने एम.बी.रेकॉर्ड करू शकत नाही. -शेख इकबाल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद