शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

निष्पाप आंदोलकांचे अटकसत्र थांबवा; मराठा समाज वर्गणी करून शासनाची नुकसानभरपाई देईल!

By बापू सोळुंके | Updated: November 7, 2023 11:55 IST

सकल मराठा समाजाची मागणी : बीड जिल्ह्यात सुरू असलेले निष्पाप आंदोलकांचे अटकसत्र थांबवा

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात शांततेत उपोषण, निदर्शने करणाऱ्या निष्पाप तरुणांनाच पोलिस टार्गेट करून जाळपोळीच्या गुन्ह्यात धरपकड करीत आहेत. तुमची नुकसानभरपाई मराठा समाज एक - एक रुपया वर्गणी करून भरून देईल; पण, हे अटकसत्र थांबवावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.

प्रा. चंद्रकांत भराट म्हणाले की, मागील दोन महिन्यांपासून मराठा समाज संपूर्ण राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण, बेमुदत उपोषण, निदर्शने आणि धरणे आंदोलनासह विविध आंदोलने करीत आहे. या आंदोलनाला गालबोट लागावे म्हणून काही समाजकंटकांनी बीड जिल्ह्यात जाळपोळ केली. ही जाळपोळ करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. मात्र, या कारवाईच्या नावाखाली आमच्या निष्पाप आंदोलकांची धरपकड का करता, असा सवाल त्यांनी केला. केवळ सरकारविरोधात आंदोलन केल्याचा राग मनात धरून पोलिस तरुणांना पकडून नेऊन पोलिस ठाण्यात बेदम मारहाण करीत असल्याचे प्रा. भराट यांनी सांगितले. हे रोखण्यासाठी उद्या विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि विभागीय आयुक्त यांना भेटणार असल्याचे यावेळी सुरेश वाकडे यांनी सांगितले. यावेळी सुनील कोटकर यांनी बीड जिल्ह्यातील एका तरुणाने त्यांना फोन करून सांगितलेली आपबिती ऐकविली. या पत्रकार परिषदेला सुकन्या भोसले, शैलेश भिसे आदींसह मराठा समाजातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

पाच हजार तरुण झाले भूमिगतयामुळे बीड जिल्ह्यातील विविध गावांतील सुमारे पाच हजार तरुण चुकीच्या अटकेच्या भीतीपोटी गावात जात नसल्याचे चित्र आहे. ऐन सणासुदीत पोलिसांनी सुरू केलेले हे अटकसत्र तत्काळ थांबवावे, अशी आमची मागणी आहे.

छगन भुजबळ यांच्या विरोधात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणारमंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करीत आहेत. शिवाय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयावरच ते मंत्री असून टीका करीत आहेत. यामुळे त्यांची पक्षप्रमुखांकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण