शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पैठणच्या नाथमंदिर परिसरात नागरिकांची अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 18:37 IST

आज सकाळी ही अतिक्रमण काढण्यास पथकाने सुरूवात करताच येथील नागरीकांनी दगडफेक करत जाळपोळ केली.

पैठण (औरंगाबाद ) : गेल्या अनेक वर्षापासून नाथमंदिर ट्रस्टच्या जागेवर अनधिकृतरित्या कब्जा करून घरे बांधलेल्या १०० ते १५० अतिक्रमण धारकांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. आज सकाळी ही अतिक्रमण काढण्यास पथकाने सुरूवात करताच येथील नागरीकांनी दगडफेक करत जाळपोळ केली. तसेच काही महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने प्रशासनाला येथून माघार घ्यावी लागली.

येथील संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळ पैठण यांच्या तालुका पैठण शिवारातील नगर परिषद हद्दीतील जमिन सर्वे नं २३३ एकूण क्षेत्रफळ २ हेक्टर ८५ आर तसेच सर्वे नं.२३५ एकूण क्षेत्रफळ २ हेक्टर २९ आर व सर्वे नं.२३७ एकूण क्षेत्रफळ १ हेक्टर ९९ आर ही मिळकत एकनाथ महाराज विश्‍वस्त मंडळाची असून या जमिनीवर गेल्या २५ ते ३० वर्षापासून येथील नागरीकांनी अतिक्रमण करून अनाधिकृत घरे बांधल्याचा आरोप मंडळाने केला होता.हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट आहे.न्यायालयाने या अतिक्रमण धारकांच्या प्रकरणावर कोणताही निर्णय दिलेला नाही.

मात्र एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाच्या वतीने अतिक्रमण धारकांना दोन दिवसांपूर्वी नोटीसा देऊन आज सकाळी अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. अतिक्रमण विभागाचे पथक, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव व तहसीलदार महेश सावंत यांच्यासह पोलिस बंदोबस्त व दंगाकाबू पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र नागरीकांचे उग्ररूप पाहताच प्रशासनाने अतिक्रमण धारकांशी चर्चा करून तात्पुरती माघार घेतली आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्यासह पो नि चंदन इमले यांच्यासह ५० ते ६० पोलिस कर्मचारी उपस्थितीत होते. या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन एकच खळबळ उडाली.

अतिक्रमण धारकांनी केली जाळपोळ अतिक्रमण पथकाला नागरीकांनी तीव्र विरोध केला व अतिक्रमण पाडू नका अशी विनंतीही केली. मात्र, पोलिस बंंदोबस्तात आलेल्या अतिक्रमण पथक ऐकत नसल्याचे पाहून नागरिकांनी दगडफेक सुरू केली.या दगडफेकीत अग्नीशामक दलाच्या वाहनांच्या काचा फुटल्या यानंतर  मोहिम थांबविण्यात आली.

महिलांचा आत्महत्येचा प्रयत्न अतिक्रमण काढण्यास विरोध करून काही अतिक्रमण धारक महिलांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांचा प्रयत्न हाणून पाडला व त्यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसTahasildarतहसीलदार