शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'भावाच्या डोक्यात झोपेतच घातला दगड'; अनैतिक संबंधातून चुलतभाऊ आणि पत्नीने खून करून प्रेत शेतात पुरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 18:00 IST

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या २४ तासात मृतदेहाची ओळख पटवून आरोपींना गजाआड केले. 

ठळक मुद्देशेतात नागरणी करत असताना प्रेत आढळून आले

पैठण : बालानगर येथील शेतात कुजलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह हा गावातील रघुनाथ घोंगडे ( रा. बालानगर ) यांचा असल्याचे तपासात समोर आले आहे. अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याने रघुनाथ घोंगडेची पत्नी व चुलत भावानेच हा खुन केल्याचे उघड झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या २४ तासात मृतदेहाची ओळख पटवून आरोपींना गजाआड केले. 

गुरूवारी बालानगर येथील गट क्रमांक १७ मधील शेताची नांगरणी सुरू होती. दरम्यान, शेतकऱ्यांने वावराच्या मध्यभागी असलेला काट्याचा ढीग बाजूला केला असता तेथे जमीनीत पुरलेला  कुजलेल्या अवस्थेतील मानवी मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर  एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी पंचनामा करून पोलीस ठाण्यात नोंद घेतली होती. प्रकरणाचा तपासाची सुत्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांना देण्यात आली होती. दरम्यान, पोलीस तपासात दत्तात्रय उर्फ शिवाजी जग्गनाथ घोंगडे व यशोदा रघुनाथ घोंगडे ( दोघे रा . बालानगर ) यांनी मिळून यशोदाचा पती रघुनाथ घोंगडे याचा जानेवारी महिन्यात खुन केला असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. 

यानंतर संशयित दत्तात्रय उर्फ शिवाजी जग्गनाथ घोंगडे (४०) रा.गट नं १७ (शेतवस्ती बालानगर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत शिवाजी याने चुलत भाऊ रघुनाथ घोंगडेची पत्नी यशोदासोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. त्यांच्या संबंधांबद्दल रघुनाथ यास समजले होते. त्यावरुन तो यशोदाला व तिच्या मुलांना नेहमी मारहाण करत असे. संबंधात अडथला येत असल्याने दोघांनी रघुनाथला संपविण्याचे ठरवले. दरम्यान, मकर संक्रातीच्या ८ दिवसांच्या आधी रघुनाथने यशोदाला मारहाण केली. त्याचदिवशी मी त्याला माझ्या शेतातील झोपण्यासाठी घेऊन गेलो. रघुनाथ झोपलेला असताना शिवाजीने घरी जाऊन यशोदाला शेतात आणले. झापेत असलेल्या रघुनाथच्या डोक्यात दगड घालून आणि काठीने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर राधाबाई भाऊसाहेब घोंगडे यांच्या शेतात मृतदेह पुरुन टाकला, अशी कबुली दिली. पोलिसांनी रघुनाथची पत्नी यशोदा (२६) हिला ताब्यात घेऊन चौकश केली. तिने देखील शिवाजीने सांगितलेला घटनाक्रम सांगून खून केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. 

ही कारवाई पोलीस अधिक्षक  मोक्षदा पाटील,  सहा. पोलीस अधीक्षक  गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे , पोलीस उपनिरिक्षक संदीप सोळंके , पोहेकॉ प्रमोद खांडेभराड , किरण गोरे , पोना नरेंद्र , संजय भोसले , पोकॉ संजय तांदळे महिला पोलीस पद्मा देवरे यांनी केली. पोलीस अधीक्षक  मोक्षदा पाटील  यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास उत्कृष्ट कामगिरीसाठी १० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद