शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे आढळली उत्तेजक औषधी द्रव्य

By बापू सोळुंके | Updated: June 30, 2024 17:19 IST

खेळाडूनंतर आता पोलीस भरतीच्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य 

छत्रपती संभाजीनगर: सातारा येथील भारत राखीव बटालियनच्या पोलीस भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. २९ जून रोजी सकाळी मैदानी चाचणीपूर्वी तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. उत्तेजक द्रव्य आणि औषधीं गोळ्यासह त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

धम्मानंद प्रकाश इंगळे (२४,रा. बोरगाव वसू, ता.चिखली,जि. बुलडाणा)असे उमेदवाराचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, सातारा परिसरातील भारत राज्य राखीव बटालियन येथील रिक्त  पोलीस शिपायांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे.  मैदानी आणि शारिरीक चाचणीसाठी अर्जदार उमेदवारांना बोलावण्यात आले आहे.  

बुलडाणा जिल्ह्यातील उमेदवार धम्मानंद इंगळे याच्यासह अन्य उमेदवारांची  काल २९ जून रोजी मैदानी आणि शारिरीक चाचणी होती. या उमेदवारांना मैदानावर सोडण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यात येते. यानुसार पोलीस नाईक अन्सार इब्राहिम शेख हे अन्य पोलिसांसह प्रत्येक उमेदवारांची तपासणी करून त्यांना मैदानावर सोडत होते. यावेळी धम्मानंद याच्या बॅगेमध्ये डीओएक्सटी-एसएल ही एक टॅबलेट, टेझोविन कंपनीची ३०एमजीची तीन टॅबलेट, डेक्सोना कंपनीच्या २एमएलचे  इंजेक्शनच्या चार बॉटल्स आढळून आले.

ही औषधी गोळ्या व इंजेक्शन उत्तेजक म्हणून गणले जातात. ही बाब पोलीस नाईक शेख आणि तेथील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला औषधीसह  ताब्यात घेतले.  पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी पूर्वी तो ही औषधी गोळ्या सेवन करून इंजेक्शन टोचून घेण्यासाठी त्याने स्वत:जवळ ठेवल्याचे  अधिकाऱ्यांना सांगितले. याप्रकरणी नाईक शेख यांनी सातारा पोलीस ठाण्यात धम्मानंदविरोधात तक्रार नोंदवली. पोलीस हवालदार गोर्डे या घटनेचा तपास करीत आहेत.

खेळाडूनंतर आता पोलीस भरतीच्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धांमध्ये उत्तेजक द्रव्य सेवन करणाऱ्या खेळाडूूंवर बंदी घातले जाते. उत्तेजक द्रव्याचा परिणाम त्याच्या खेळावर होत असतो. यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची डोपींग चाचणी केली जाते. आता पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे उत्तेजक औषधी आणि इंजेक्शन आढळून आल्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद