शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक वेतनाचा पेच कायम; देयके आॅफलाईन पद्धतीने स्वीकारण्याचे उपसचिवांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 14:10 IST

वित्त विभागाने परवानगी दिल्यास शिक्षकांची वेतन देयके आॅफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील, असे आश्वासन शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांना दिले.

औरंगाबाद : वित्त विभागाने परवानगी दिल्यास शिक्षकांची वेतन देयके आॅफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील, असे आश्वासन शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांना दिले.

वेतनाअभावी शिक्षकांची कुचंबणा होऊ नये, यासाठी शालार्थ वेतनप्रणालीची सेवा पूर्ववत होईपर्यंत वेतन देयके ही आॅफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांनी शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी यांच्याकडे केली होती. शालार्थ वेतनप्रणालीचा विषय हा शालेय शिक्षण उपसचिवांकडे असल्यामुळे पदाधिकार्‍यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा केला. सर्व्हर बंद पडल्यामुळे शिक्षकांना येणार्‍या अडचणी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. तेव्हा चौधरी यांनी सांगितले की, यासंबंधीची फाईल ही वित्त विभागाकडे पाठविण्यात आली आहे.

आॅफलाईन पद्धतीने वेतन देयके स्वीकारण्याची परवानगी वित्त विभागाला मागितली आहे. वित्त विभागाने परवानगी दिल्यास एक- दोन दिवसांत शिक्षकांची वेतन देयके आॅफलाईन स्वीकारली जातील, असे चौधरी यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांना सांगितले. शिक्षकांची वेतन देयके ज्या वेतनप्रणालीमधून काढली जातात, त्या शालार्थ वेतनप्रणालीची सेवा गेल्या १० जानेवारीपासून बंद पडल्यामुळे शिक्षकांना वेतनासंबंधीची माहिती भरण्यास अडचणी येत आहेत. यापूर्वी आॅफलाईन पद्धतीने शिक्षकांची वेतन देयके काढली जात होती. त्यानंतर यासाठी आॅनलाईन शालार्थ प्रणाली सुरू करण्यात आली. दर महिन्याला वेतन पथक अधीक्षक कार्यालयामार्फ त वेतनासंबंधीची देयके स्वीकारली जातात. मात्र, गेल्या १० जानेवारीपासून सर्व्हर बंद आहे.

विलंबाने वेतन ही नित्याचीच बाबयासंदर्भात प्राथमिक शिक्षक संघाचे राजेश हिवाळे म्हणाले की, आता शालार्थ वेतनप्रणाली बंद पडल्यामुळे शिक्षकांना उशिरा वेतन मिळेल. पण, आतापर्यंत शालार्थ वेतनप्रणालीच्याच माध्यमातून वेतन अदा केले जात होते. तेव्हाही दरमहा उशिरानेच शिक्षकांना वेतन मिळायचे. शिक्षकांना दरमहा १ तारखेलाच वेतन अदा करण्यात यावे, यासाठीही प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMONEYपैसा