शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र बापाचा विकृतपणा; मुलीवर अत्याचार करून चित्रीकरण, ब्लॅकमेलिंग करून पुन्हा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:16 IST

अखेर संतप्त मुलीने चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विकृत सावत्र बापाला अटक केली.

छत्रपती संभाजीनगर : आई आजारी असल्याचे सांगून ४३ वर्षीय विकृत सावत्र बापाने १९ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून तिला ब्लॅकमेल करत पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न केला. अखेर संतप्त मुलीने चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विकृत सावत्र बापाला अटक केली.

१९ वर्षीय राही (नाव बदलले आहे) खासगी नोकरी करून महाविद्यालयीन शिक्षणही घेते. कौटुंबिक वादातून तिच्या आईने तिच्या वडिलांपासून काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता. राहीची आई एका रुग्णालयात नोकरी करत होती. त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या ४३ वर्षीय पुरुषाशी तिने दुसरे लग्न केले. लग्नानंतर राही व तिची बहीण यांनाही त्याने स्वीकारले. काही काळानंतर राहीच्या आईला त्या इसमापासून एक मुलगीही झाली. सर्वजण बीड बायपास परिसरात राहतात. काही दिवसांपासून राहीच्या आईची प्रकृती खराब असल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. २२ एप्रिलला मध्यरात्री २:३० वाजता राही तिच्या बहिणींसह वेगळ्या खोलीत झोपलेली असताना बापाने त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला. ‘तुझ्या आईची तब्येत बिघडली आहे’ असे सांगून त्याने राहीला बाहेर बोलावले. राही हॉलमध्ये आली असता बापाने तिच्यावर अत्याचार केला. त्याचे त्याने मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले. आई आजारी असल्याने आणि कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीने राहीने ही बाब कोणालाही सांगितली नाही.

ब्लॅकमेलिंग करून पुन्हा प्रयत्नआरोपी वडिलांनी मोबाईलमधील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करत अत्याचाराचे प्रयत्न केले. त्याच्या त्रासाला कंटाळून राहीने थेट चिकलठाणा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तिच्या तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी विकृत बापावर गुन्हा दाखल करून अटक केली. उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरsexual harassmentलैंगिक छळ