शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादसाठी विमानसेवा वाढविण्याच्या दिशेने पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 18:37 IST

नागरी उड्डयन मंत्रालयाच्या हालचालींना वेग

ठळक मुद्देमागणीनुसार औरंगाबादहून सेवा सुरू करण्याचा प्रयत्नअनियमिततेमुळे उद्योग, पर्यटनासह अनेक क्षेत्रांना फटका

औरंगाबाद : औरंगाबादहूनविमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती नागरी उड्डयन मंत्रालयाने मंगळवारी टिष्ट्वट करून दिली. त्यामुळे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने पाऊल पडल्याचे दिसत आहे. 

नागरी उड्डयन मंत्रालयाने मंगळवारी टष्ट्वीट करून औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती दिली. मागणीचा विचार क रून कंपन्यांकडून विमानसेवा सुरू केली जाईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.गेल्या काही वर्षांत औरंगाबादहून सुरू असलेली विमाने बंद पडली. दोन महिन्यांपूर्वी जेट एअरवेजची मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा बंद पडली. यापूर्वी औरंगाबादहून सुरू असलेली स्पाईस जेटची विमानसेवा बंद झाली होती. सध्या एअर इंडिया, ट्रूजेट या दोन कंपन्यांकडून विमानसेवा दिली जात आहे. या कंपन्यांमुळे दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद शहराबरोबर विमान हवाई सेवेने जोडलेले आहे. शहराची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी  आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे.

इंडिगो एअरलाईन्स, डेक्कन एव्हिएशनसह झूम एअर या कंपन्यांनी औरंगाबादहून विमान सुरू करण्यास रुची दर्शविली होती. औरंगाबाद-दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करण्यास झूम एअरने प्रस्तावही डीजीसीएकडे सादर केला होता. कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर औरंगाबाद-दिल्ली मार्गाची नोंद करून विमानसेवा सुरू होणार असल्याचे संकेतही दिले होते; परंतु प्रत्यक्षात या विमान  कंपन्यांची प्रतीक्षाच आहे.

विमानसेवेच्या अनियमिततेमुळे उद्योग, पर्यटनासह अनेक क्षेत्रांना फटकाचिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने सोयीसुविधांत देशभरात भरारी घेतली आहे; परंतु हवाई कनेक्टिव्हिटीत विमानतळ मागेच आहे. ४जेट एअरवेजचे विमान बंद झाल्याने अनेक उद्योग, पर्यटनासह अनेक क्षेत्रांना फटका बसत आहे. त्यामुळे औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्याची मागणी होते आहे.    

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानAurangabadऔरंगाबाद