शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:12 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी योग्य नियोजन करण्यासाठी डॉ. नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत समितीची स्थापना; स्वयंसेवी संस्थांकडून निधी उभारणार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी योग्य नियोजन करण्यासाठी डॉ. नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक बुधवारी (दि.१२) झाली. या बैठकीत एकूण २२ विषय चर्चेला आले. तर ऐनवेळी ४ विषय घेण्यात आले. यात व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला असल्याकडे सदस्यांचे लक्ष वेधले. अनेक विद्यार्थ्यांना गावाकडून येणारे पैसे बंद झाल्यामुळे शिक्षण सोडून परत जाण्याची वेळ आली आहे. तेव्हा विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मागील दुष्काळात विद्यार्थ्यांना मोफत जेवण उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. यावेळीही काही स्वयंसेवी संस्थांची आर्थिक मदत घेऊन दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. या भूमिकेला व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दिला. तसेच विविध स्वयंसेवी संस्था, उद्योगांकडून आर्थिक मदत मिळविणे, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे मदत करता येईल, याचे नियोजन करण्यासाठी डॉ. नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीमध्ये किशोर शितोळे, डॉ. राजेश करपे, प्रा. सुनील निकम, डॉ. शंकर अंभोरे आणि डॉ. राहुल म्हस्के यांचा समावेश आहे. याशिवाय व्यवस्थापन परिषदेत सिमेंट रस्त्याऐवजी डांबरी रस्ता बनविणे, वाहन भत्त्यात वाढ करणे, असे नियमित विषयांनाही मंजुरी देण्यात आली आहे.विद्यापीठाच्या जमिनीचा घेणार आढावाविद्यापीठाने विविध संस्थांना शेकडो एकर जमीन लीजवर दिलेली आहे. यातील काही संस्था जमिनीचा वापर योग्य कारणासाठी करीत नाहीत. या संस्थांकडून जमिनीच्या वापराची माहिती घेऊन वापरात असलेली जमीन संस्थांकडे ठेवणे आणि उर्वरित शिल्लक जमीन परत घेण्यासाठीची एका समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी डॉ. फुलचंद सलामपुरे यांची नियुक्ती केली. तर डॉ.राजेश करपे आणि डॉ. शंकर अंभोरे यांची सदस्यपदी नियुक्ती केली.प्राध्यापकांना मिळणार १५ सीएल रजाव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ऐनवेळी महाविद्यालयातील संलग्न प्राध्यापकांना ८ किरकोळ रजा (सीएल) मंजूर करण्यात येतात. मात्र राज्यातील इतर विद्यापीठे १५ सीएल देतात. त्यांच्याप्रमाणेच आपल्या विद्यापीठातही १५ सीएल रजा देण्याचा ठराव डॉ. राजेश करपे यांनी मांडला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :droughtदुष्काळuniversityविद्यापीठAurangabadऔरंगाबाद