शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसींना ‘इम्प्रेस’ करण्यासाठी ३०० मोबाइलची चोरी; ३ अल्पवयीन मित्रांचा कारनामा

By सुमित डोळे | Updated: July 13, 2023 13:45 IST

मुकुंदवाडी पोलिसांकडून तीन अल्पवयीन ताब्यात; चोवीस तासांत ३८ मोबाइल हस्तगत

छत्रपती संभाजीनगर : प्रेयसींना ‘इम्प्रेस’ करण्याच्या नादात अल्पवयीन मित्रांनी सुसाट माेबाइल चोरी सुरू केली. मुकुंदवाडीच्या गेट क्र. ५६ जवळ रेल्वेचा वेग मंदावताच दरवाजातील प्रवाशाचा मोबाइल खाली पाडून चोरायचे. असे एक दोन नाही तर ३०० पेक्षा अधिक मोबाइल त्यांनी चाेरले. मंगळवारी रंगेहाथ पकडल्यानंतर प्राथमिक चौकशीत चोरीचे ३८ मोबाइल मिळवण्यात मुकुंदवाडी पोलिसांना यश आले.

मुकुंदवाडी पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पंकज मोरे यांना तिघे मोबाइल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या सूचनेवरून मोरे यांनी रेल्वेस्थानकात सापळा रचला. तिघे येताच त्यांना ताब्यात घेतले. तेव्हा नुकतेच चोरलेले तीन मोबाइल आढळून आले. मोरे यांच्यासह नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, अनिल थोरे, अंमलदार अनिल थोरे, गणेश वाघ, योगेश बावस्कर, अनिल कोमटवार, सुभाष राठोड, शैलेश अडियाल, दिनेश राठोड, प्रभाकर पाटील यांनी ही कामगिरी केली.

सायंकाळी सक्रियरेल्वेतून प्रवाशांचे मोबाइल चोरीला जाण्याचे प्रमाण काही दिवसांमध्ये वाढले होते. उस्मानपुरा ते चिकलठाण्याच्या तीन स्थानकांदरम्यान रेल्वेचा वेग मंदावतो. याच दरम्यान सायंकाळी येणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांना लक्ष्य केले जाई. एक चोर लांबून हातात मोबाइल असलेला प्रवासी हेरून पुढच्या दोघांना इशारा करे. मग एकजण तयार राहून काठीने हाताला झटका मारत मोबाइल खाली पाडून त्याचा झेल पकडत पसार होई. स्थानकावर झोपलेल्यांचे देखील ते मोबाइल लंपास करत.

मोबाईल  ५५ हजारांचा, विक्री पाच हजारांतआरोपींमध्ये दोघे १७, तर एक १६ वर्षांचा आहे. वडील खासगी नोकरी तर आई, भाऊ केटरिंगमध्ये काम करतात. तिघेही नावाला विद्यार्थी असून, प्रत्येकाला एक, दोन मैत्रिणी आहेत. त्यांच्यावर पैशांची उधळण करणे, महागडे मोबाइल दाखवून ‘इम्प्रेस’ करण्याचा छंद त्यांना जडला. शहरात ३८ मोबाइल विकले. इतर मोबाइल बीड, नांदेडच्या विक्रेत्यांना त्यांनी विकले. नुकताच लाँच झालेला एक ५५ हजारांचा मोबाइल त्यांनी अवघा ५ हजारांत एका मजुराला विकला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद