शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

स्टाइल में रहनेका! युनिसेक्स पार्लरची वाढतेय क्रेझ, एकाच सलूनमध्ये ठरते संपूर्ण कुटुंबाची फॅशन

By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 16, 2023 15:46 IST

सहकुटुंबाचं एकाच ठिकाणी कटिंग, फेशियल : शहरात युनिसेक्स पार्लरची वाढतेय क्रेझ

औरंगाबाद : पती, पत्नी, मुलगा, मुलगी असे कुटुंबातील सर्व सदस्य एकाच ठिकाणी आरामदायी खुर्चीवर बसून हेअर कट, फेशियल, हेअर कलर करीत आहेत, ही काही परिकल्पना नाही. तर हे सत्यात उतरले आहे. अशा युनिसेक्स सलूनच्या संख्येने चाळिशीचा आकडा ओलांडला आहे. वीकेण्डला अख्खे कुटुंबच या आधुनिक सलूनमध्ये जाऊन आपले सौंदर्य निखारते. यामुळे पुरुषांसाठी स्वतंत्र सलून व फक्त महिलांसाठी ब्युटी पार्लर ही पारंपरिक व्यवसायाची संकल्पना मागे पडून त्याची जागा आलिशान ‘फॅमिली सलून’ घेत आहे.

ब्रँडेड सलूनशहरात ब्रँडेड सलूनची संख्या वाढत आहे. याच काॅर्पाेरेट कंपन्यांनी ‘फॅमिली सलून’ची कल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. आजघडीला शहरात ४० पेक्षा अधिक लहान-मोठे ‘फॅमिली सलून’ सुरू आहेत. त्यातील १० सलून ब्रँडेड आहेत.

प्रशिक्षित तज्ज्ञ स्टाफब्रँडेड सलूनमध्ये प्रशिक्षित तज्ज्ञ स्टाफ सेवा देत आहेत. ग्राहकांचे स्वागत करण्यापासून त्यांना चहा, कॉफी, पाणी देणे, नंतर हेअरवॉश करून मग चेहऱ्याला साजेल, अशी कटिंग व केसाला रंग लावून देण्यापर्यंत कर्मचारी सेवा देतात.

कटिंग २५०, महिलांचे हेअरकट ५०० रुपयातया फॅमिली सलूनमध्ये पुरुषांची कटिंग २५० रुपये, हेअरकट ॲडव्हान्स ४०० रुपये, १० वर्षांवरील मुलांची कटिंग २०० तर मुलींचे हेअरकट ३५० रुपयांपासून, महिलांचे हेअरकट व हेअर वॉश ५०० रुपये, हेअर स्टायलिंग १,२०० रुपयांपासून पुढे दर आकारले जात आहेत.

नवरदेव, नवरी मेकअप करून थेट विवाहस्थळीलग्नतिथीच्या एक महिने आधीपासून नवरदेव व नवरीचे फॅमिली सलूनमध्ये येणे सुरू होते. गुमिंग प्री पॅकेज, ब्रायडल प्री पॅकेज यासाठी असते. हेअर स्टाइलपासून ते लेन्सपर्यंत चेहऱ्याचा कायापालट केला जातो. लग्नाच्या दिवशी येथे मेकअप करूनच वधू-वर विवाहस्थळी जातात. यासाठी पाच ते ५० हजारांपर्यंतचे पॅकेज असते.

३० ते ४० लाखांची उलाढालशहरातील सर्व ४० ‘फॅमिली’ सलून मिळून महिन्याकाठी ३० ते ४० लाखांची उलाढाल होते. श्रीमंत तर आहेच; पण नवश्रीमंत कुटुंब या फॅमिली सलूनमध्ये जाणे पसंत करीत आहेत.- किशन लिंगायत, मालक, फॅमिली सलून

टॅग्स :fashionफॅशनAurangabadऔरंगाबाद