शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

'जागते रहो...' कैलास मानसरोवर यात्रेच्या नावाखाली नेपाळचे एजंट जमविताहेत ‘गल्ला’

By संतोष हिरेमठ | Updated: April 6, 2023 20:09 IST

खात्री करा, नाहीतर पश्चात्ताप; कैलास मानसरोवर यात्रा सुरू होण्याचे संकेत नसताना बुकिंग, थोडं थांबा, नाही तर फसाल

छत्रपती संभाजीनगर : कैलास मानसरोवर यात्रा कोरोना काळापासून बंद आहे. ही ‘यात्रा चालू झाली’, ‘लवकरच सुरू होणार आहे’, असे सांगत नेपाळचे एजंट बुकिंग करून ‘गल्ला’ जमवित आहेत. अशाच काही एजंटांशी फोनवर संपर्क साधून ‘लोकमत’ने संवाद साधला. तेव्हा एजंटांनी सारवासारव करीत थेट फोन बंद करून टाकले. त्यामुळे यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे.

कैलास मानसरोवर यात्रेला ऐतिहासिक, धार्मिक आणि पौराणिक महत्त्व असल्याने दरवर्षी हजारो भाविक याला भेट देत असतात. ही यात्रा कोविड काळापासून बंद आहे. असंख्य भाविक ही यात्रा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. या सगळ्यात सध्या ही यात्रा चालू झाली आहे, असे काही जणांकडून सांगण्यात येत आहे. कैलास मानसरोवर यात्रा नेपाळमार्गे असंख्य ट्रॅव्हल एजन्सी चालवतात. शासनाने परवानगी दिली तरीही ही यात्रा जुलैनंतर सुरू होऊ शकेल, पण त्याचे नियम काय असतील, सीमेवर आरटीपीसीआर तपासणी होईल का, क्वाॅरंटाईन करणार का, हे काहीही स्पष्ट नसताना काहींनी बुकिंग सुरू केली आहे.

खात्री करा, नाहीतर पश्चात्तापट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगरचे मंगेश कपोते म्हणाले, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगरमार्फत सर्व भाविकांना आवाहन आहे की, अशा प्रचाराला बळी पडू नये. जर आपण बुकिंग कराल तर आपली फसवणूक होईल. आपले पैसे अडकून पडतील. जर बुकींग केली असल्यास आपली यात्रा निश्चित तारखेस न गेल्यास कंपनी पैसे परत करणार आहे का, नुकसान भरपाई देणार का, याची खात्री करून घ्यावी. संबंधित एजन्सी ही अधिकृत आहे का ? तसेच जीएसटी रजिस्टर्ड आहे का? नेपाळच्या पुढे कैलास यात्रा घेऊन जाणारी कंपनी ‘एकेटीओएन’ मेंबर आहे का ? याचीही खात्री करावी.

एजंटाशी झालेला संवादप्रतिनिधी : कैलास मानसरोवर यात्रेसाठी बुकिंग करायची आहे.एजंट : मोबाईल नंबर कोणाकडून मिळाला, हे सांगा?प्रतिनिधी : तुमच्या सहकाऱ्यांकडूनच मिळाला?एजंट : बुकिंगविषयी, यात्रेविषयी आता काही सांगता येणार नाही.इतका संवाद झाल्यानंतर एजंटाने फोन बंद करून टाकला. दुसऱ्या नंबरवरही संपर्क साधला. परंतु तो नंबरदेखील बंद करून टाकण्यात आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद