शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची मुदतवाढ कागदावरच; कार्यान्वित कधी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 19:41 IST

१७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढीचा जीआर न काढल्यास जनता विकास परिषद उतरणार रस्त्यावर

- स. सो. खंडाळकरऔरंगाबाद :मराठवाडा वैधानिक विकास मंडळासह राज्यातील सर्व विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची घोषणा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केली. तसा निर्णयही मंत्रिमंडळात घेतला. मात्र, त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) न काढल्याने मुदतवाढीचे घोंगडे भिजत पडले आहे.

राज्यातील वैधानिक विकास मंडळांची मुदत संपून अडीच वर्षे झाले तरी मुदतवाढ न मिळाल्याने या मंडळांचे कार्य ठप्प झाले आहे. यावर मराठवाड्यातून मागणी झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेवरून पायउतार होण्यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या मंडळांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ‘त्या’ मंत्रिमंडळ बैठकीतील बहुतांश निर्णय रद्द केले. विकास मंडळांच्या मुदतवाढीचा निर्णय मात्र कायम ठेवला. परंतु, अद्याप या संबंधीचा जीआर काढलेला नाही. परिणामी, या मंडळांवरील तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.

सचिवही प्रतीक्षेत, ना शिपाई, ना चालकजिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे फक्त कार्यालय चालू आहे. आयएएस दर्जाचे सचिव विजयकुमार फड कार्यालयात बसून असतात. त्यांना ना ड्रायव्हर उपलब्ध आहे, ना शिपाई. चार-पाच कर्मचारी आहेत; पण त्यांनाही काम नाही.

विकास परिषदेने दिला आंदोलनाचा इशाराअलीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे लातूरला आले असताना मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर शाखेने त्यांना निवेदन सादर केले व मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीवर चर्चा झाली. त्यावेळी राज्यपाल एवढेच म्हणाले की, हो जायेगा!’ सोमवारी औरंगाबादेत जनता विकास परिषदेची बैठक झाली. परिषदेचे अध्यक्ष व माजी खा. व्यंकटेश काब्दे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देेण्यात आला. मराठवाडा मुक्ती दिनापर्यंत (१७ सप्टेंबर) मुदतवाढीचा जीआर काढण्यात आला नाही तर जनता विकास परिषद रस्त्यावर उतरणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकार