शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘ॲडिनो व्हायरस’मुळे राज्यभर डोळ्यांची साथ; काय आहेत लक्षणे? अशी घ्या काळजी

By मुजीब देवणीकर | Updated: August 2, 2023 13:04 IST

डोळे येणे हा संसर्गजन्य रोग, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी.

छत्रपती संभाजीनगर : शहरात काळा चष्मा लावून फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. ॲडिनो व्हायरसमुळे डोळ्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मागील चार दिवसांत ११९२ जणांना लागण झाली. मंगळवारी एकाच दिवसात पालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रातील नोंदींनुसार लागण झालेले २८६ रुग्ण उपचारासाठी आले होते.

डोळे येण्याची साथ राज्यभर पसरली आहे. शहरातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने डोळे आलेल्या व्यक्तींची रोजच्या रोज नोंद ठेवणे सुरू केले आहे. महापालिकेची ४० आरोग्य केंद्रे व रुग्णालयांमध्ये ही नोंद ठेवली जात आहे. चार दिवसांपासून रुग्णांची नोंद ठेवण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी एका स्वतंत्र आरोग्य अधिकाऱ्याची कार्यक्रम अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दिवसभरात डोळ्याच्या साथीचे नवीन २८६ रुग्ण आढळून आले.

डोळे येण्याची लक्षणे : डोळे लाल होणे.वारंवार पाणी गळणे.डोळ्यांना सूज येणे.काही वेळा डोळ्यातून चिकट द्रव पदार्थ बाहेर पडणे.डोळ्यांना खाज सुटते.डोळे जड वाटतात व डोळ्यात काही तरी गेल्यासारखे वाटते.

अशी काळजी घ्या: डोळ्याला स्वच्छ पाण्याने सतत धुणे.इतरांचा रुमाल, टॉवेल, कपड्याने डोळे पुसू नये.डोळ्यांना सतत स्पर्श करू नये.घराबाहेर जाताना गॉगल वापरा.संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्र तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.शाळा, वसतिगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी साथ असेल तर रुग्णाला वेगळे ठेवा.डोळे येणे हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे एकापासून दुसऱ्याने अंतर ठेवून राहावे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी.डोळे आल्यानंतर स्टेरॉइड, आय ड्रॉपचा वापर टाळावा.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादeye care tipsडोळ्यांची निगा