शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात अपघाताच्या ‘क्लेमचा गेम’; मृताच्या नातेवाइकांना मिळणाऱ्या विमा रक्कमेवर 'डल्ला'

By संतोष हिरेमठ | Updated: January 10, 2024 14:56 IST

अपघातातील मयताच्या नातेवाइकांना मिळणाऱ्या रकमेवरच ‘डल्ला’

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरसह राज्यभर अपघाताच्या ‘क्लेमचा गेम’ सुरू आहे. अपघातात मयत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना क्लेमची ७० ते ८० टक्केच रक्कम दिली जाते. उर्वरित क्लेमच्या रकमेवर अनेकजण डल्ला मारतात. राज्यातील अपघाताच्या केस थेट कर्नाटकातही देण्याचाही प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

‘अपघाताची केस आम्हालाच द्या, चांगला क्लेम मिळवून देऊ. तुम्हाला काहीही खर्च येणार नाही. फक्त क्लेममध्ये १० ते १५ टक्के आमचे...’ असे ‘दुकान’ मांडण्याचा उद्योग घाटीतील शवविच्छेदनगृह परिसरात सुरू आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारी रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्तानंतर राज्यातील अनेक ठिकाणी असाच प्रकार सुरू असल्याचे सांगत अनेकांनी ‘लोकमत’कडे कैफियत मांडली. रुग्णालयासह तपास करणाऱ्या यंत्रणेतील अनेकांचा ‘क्लेम’च्या उद्योगात सहभाग असून, मृताच्या नातेवाइकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे सांगण्यात आले.

काहीजणांकडे ‘क्लेम’ची प्रकरणे सर्वाधिक का?क्लेमची प्रकरणे काही मोजक्या लोकांकडेच सर्वाधिक का आहेत, याचा शोध यंत्रणेने घेण्याची गरज आहे, असे सांगण्यात आले. क्लेमची रक्कम जास्तीत जास्त मिळण्यासाठी कागदोपत्री गैरप्रकारही केले जात असल्याचे सांगण्यात आले.

शवविच्छेदनगृह परिसरातच देतात तत्काळ रक्कमअपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना काही एजंट शवविच्छेदनगृहाच्या परिसरातच एक ते दीड लाख रुपयांची रक्कम मदत म्हणून देतात. त्यातून अपघाताची केस त्या एजंटला मिळण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे सांगण्यात आले.

राज्यभर प्रकार सुरू अपघात होताच माहिती पुरविणारे कामाला लागतात. राज्यभर हा प्रकार सुरू आहे. बार्शी तालुक्यात एक अपघात प्रकरण कर्नाटक राज्यामध्ये विजयपूर कोर्टातील वकिलांकडे देऊ, तेथे पैसे जास्त मिळतात, अशा भूलथापा देण्यात आल्या. शेवटी ते प्रकरण विजयपूर कोर्टात देण्यास भाग पाडलेच. असा प्रकार सर्रास सुरूच आहे.- ॲड. एस. एस. रितापुरे, धाराशिव.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद