लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील सर्व संघटनांचे मिळून १६ हजार कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून सातवा वेतन आयोग आणि पेन्शनसह विविध मागण्यांसाठी तीन दिवस संप सुरू केल्यामुळे अधिकाºयांसह सामान्य नागरिकांची पहिल्याच दिवशी तारांबळ उडाली. राजपत्रित अधिकारी संघटना आणि कास्ट्राईब कर्मचारी महासंघ संपातून बाहेर असल्यामुळे त्या संघटनेचे अधिकारी आणि कर्मचारी कामावर होते.पहिल्या दिवशी १०० टक्के संप यशस्वी झाल्याचा दावा राज्य मध्यवर्ती महसूल कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष महेंद्र गिरगे यांनी केला असला तरी सायंकाळी ४ वाजेपर्यंत विभागात १५ हजार ५०० च्या आसपास कर्मचाºयांची गैरहजेरी विभागीय पातळीवर नोंदविण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. शासनाने हा संप गांभीर्याने घेतला आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांचे वेतन कपात करण्याचे आदेश शासनाने सोमवारी सायंकाळी जारी केल्यामुळे पदोन्नत नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, वाहनचालक, शिपाई, लिपिक, अव्वल कारकून यांचे वेतन कपात होणार आहे. विभागातील ५ हजार ७१२ पैकी ११८ कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर होते. असे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शासनाला कळविले आहे. दरम्यान कर्मचारी संघटनेचे गिरगे म्हणाले, लोकप्रतिनिधी एक दिवसासाठी पदावर राहिले तरी त्यांना पेन्शन मिळते. मात्र, वयाची ३० ते ३५ वर्षे शासकीय सेवा देऊनही कर्मचाºयांना पेन्शन न देण्याची शासनाची भूमिका योग्य नाही.शेतकºयांची तारांबळजमिनीच्या वादाप्रकरणी विभागीय आयुक्तांकडे मंगळवारी सुनावणी होती. त्यासाठी बावची, ता. परंडा, जि. उस्मानाबाद येथील ११ शेतकरी आले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत ते शेतकरी महसूल उपायुक्तांच्या दालनाबाहेर बसून होते. संप असल्याचे त्यांना माहिती नव्हते, तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी संपावर असल्यामुळे त्या शेतकºयांचा निरोपही अधिकाºयांकडे कुणी दिला नाही. काही न खाता-पिता ते शेतकरी आयुक्तालयात होते. माध्यम प्रतिनिधींनी उपायुक्तांकडे तो प्रकार सांगितल्यानंतर त्यांच्या सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली. कार्यालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयांवर अवलंबून असल्याचे दिसून आले.मराठवाड्यातीलमहसूल कर्मचारीकर्मचारी पदनाम संख्यानायब तहसीलदार २५०मंडळ अधिकारी ४००तलाठी २११२वाहनचालक १५०शिपाई ९००लिपिक १०००अव्वल कारकून ९००एकूण ५७१२...............
मराठवाड्यात संपामुळे राज्य सरकारची यंत्रणा गप्पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:18 IST
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्व संघटनांचे मिळून १६ हजार कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून सातवा वेतन आयोग आणि पेन्शनसह विविध ...
मराठवाड्यात संपामुळे राज्य सरकारची यंत्रणा गप्पगार
ठळक मुद्देनागरिकांची तारांबळ : महसूलचे १६ हजार कर्मचारी; राजपत्रित अधिकारी आणि कास्ट्राईब कर्मचारी महासंघ संपातून बाहेर