शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचा केंद्र सरकारवर नाही भरोसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 10:25 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी १४ कोटी ५० लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांची तरतूद करण्यात आली; परंतु जोपर्यंत केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत जिल्हा नियोजन समितीतून त्या कामांना मंजुरी देण्यात येऊ नये, अशी भूमिका राज्य शासनाने घेतल्यामुळे या उन्हाळ्यातही नागरिकांची पाण्यासाठी वणवण थांबणार नाही. राज्य शासनाचा केंद्र शासनावर भरोसा नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देजलसंकट : १४ कोटी ५० लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांच्या संचिकांना मिळेना मंजुरी

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी १४ कोटी ५० लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांची तरतूद करण्यात आली; परंतु जोपर्यंत केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत जिल्हा नियोजन समितीतून त्या कामांना मंजुरी देण्यात येऊ नये, अशी भूमिका राज्य शासनाने घेतल्यामुळे या उन्हाळ्यातही नागरिकांची पाण्यासाठी वणवण थांबणार नाही. राज्य शासनाचा केंद्र शासनावर भरोसा नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.जिल्हा नियोजन समितीची ३१ मार्चपूर्वी संचिका मंजुरीसाठी घाई सुरू आहे; परंतु यामध्ये पाणीपुरवठा योजनांच्या १४ कोटी ५० लाख रुपयांच्या संचिका तशाच पडून आहेत.केंद्र शासनाकडून जोपर्यंत निधी येत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठा योजनांच्या संचिका मंजूर करू नयेत, अशा सूचना राज्याच्या अर्थ विभागाकडून नियोजन विभागाला देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाने जर योजनेसाठी निधी दिला नाही, तर राज्यावर त्याचा भार पडेल. त्यामुळे राज्य अर्थ व नियोजन विभाग त्याकडे लक्ष देण्यास तयारनाही.जिल्हा नियोजन विभागाने इतर कामांच्या संचिकांना मंजुरी दिली आहे; परंतु पाणीपुरवठा कामांना मंजुरी मिळत नाही, शासन काही मार्गदर्शन करण्यास तयार नाही. त्यामुळे अवघड परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.केंद्र शासनाकडून जर राष्ट्रीय पेयजल योजनेचा निधी आला नाही तरी राज्य शासनाने याचा भार उचलला तर काही हरकत नाही. यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणी केली आहे; परंतु शासनाने थेट केंद्र शासनाकडे बोट दाखवून अंग काढून घेतले आहे.गेल्या पावसाळ्यात औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री या तालुक्यांमध्ये अतिशय कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे, जर संचिकांना मंजुरी मिळाली नाही, तर केलेली तरतूद रद्द होण्याची शक्यता नियोजन विभागाने वर्तविली.मराठवाड्यासह राज्याची अवस्थामराठवाड्यासह संपूर्ण राज्यात राष्ट्रीय पेयजल योजनांसाठी केंद्र शासनाकडून तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्यासाठी निधी देण्याचे नियोजन आहे; परंतु केंद्राकडून राज्याला निधी न मिळाल्यामुळे त्या योजनांसाठी तयार करण्यात आलेल्या कामांच्या संचिका राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागात मंजुरीअभावी पडून असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.मराठवाड्यात पाणीपुरवठा, स्वच्छतेच्या योजना राबविण्यासाठी सुमारे १ हजार ४३४ कोटी रुपयांचा निधी तरतूद केला आहे. मार्च २०१८ पर्यंत पाणीपुरवठ्याच्या सर्व योजना ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी राबविण्याचा उद्देश असल्याचे नोव्हेंबर २०१७ मध्ये जाहीर करण्यात आले होते.मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मराठवाड्यात ४६४ कोटी, जलस्वराज्य टप्पा २ साठी १०९ कोटी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेसाठी ९४ कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याचा दावा पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांनी केला होता. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामांचे काय होणार, शासन त्याला मंजुरी देणार की नाही, याप्रकरणी राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारGovernmentसरकारgovernment schemeसरकारी योजना