शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

उद्योजक निर्मितीची पायाभरणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:17 AM

विद्यार्थी, प्राध्यापकांच्या संशोधनाला प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रुपांतरित करणाऱ्या प्रक्रियेचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घालण्यात येत आहे. भविष्यातील उद्योजक निर्मितीचा कारखाना बनविण्यात महत्त्वाचा वाटा उचलणार असलेल्या विद्यापीठातील बजाज इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन मंगळवारी (दि.१४) थाटात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विद्यार्थी, प्राध्यापकांच्या संशोधनाला प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रुपांतरित करणाऱ्या प्रक्रियेचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घालण्यात येत आहे. भविष्यातील उद्योजक निर्मितीचा कारखाना बनविण्यात महत्त्वाचा वाटा उचलणार असलेल्या विद्यापीठातील बजाज इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन मंगळवारी (दि.१४) थाटात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.विद्यापीठात बजाज उद्योग समूहाने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) इन्क्युबेशन सेंटर उभारण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून तब्बल दहा हजार स्क्वेअर फुटांवर इन्क्युबेशन सेंटरचा तळमजला उभारण्यात आला आहे.या पहिल्या टप्प्यातील सेंटरचे लोकार्पण बजाज आॅटो लिमिटेडचे कार्यकारी संचालक प्रदीप श्रीवास्तव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी बजाज सीएसआरचे सल्लागार सी. पी. त्रिपाठी, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे आणि समन्वयक डॉ. एम. डी. शिरसाट उपस्थित राहणार आहेत. हा उद्घाटन सोहळा मंगळवारी (दि.१४) सकाळी ११.३० वाजता सिफार्ट सभागृहात होणार आहे. देशातील राज्य विद्यापीठांमध्ये इन्क्युबेशन सेंटर उभारणारे हे विद्यापीठ एकमेव आहे. राज्यातील एकाही विद्यापीठामध्ये इन्क्युबेशन सेंटर नसल्याचा दावाही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला. २०१४ साली पहिल्यांदा इन्क्युबेशन सेंटरची उभारणी करण्याविषयी बजाज उद्योग समूहाचे राहुल बजाज यांच्याशी चर्चा झाली होती. यानंतर २०१५ मध्ये कंपनीने हा प्रस्ताव मान्य करून निधी देण्यास मंजुरी दिली. यानुसार पहिल्या टप्प्यात कंपनीने दीड कोटी रुपयांचा निधी दिला. यात पाच मजली इन्क्युबेशन सेंटरमधील तळमजल्याचे बांधकाम करण्यात आले. यात एकूण २५ कंपन्यांना उपयोगी असणारे संशोधन करता येईल. अशा पाच मजल्याची उभारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक मजल्यावर २५ प्रमाणे १२५ प्राध्यापक, विद्यार्थी आणि संशोधक एकाच वेळी वेगवेगळ्या गोष्टीत उपयोगी संशोधन करतील, असे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर म्हणाले, इन्क्युबेशन सेंटर हा तंत्रज्ञान निर्मितीचे उगमस्थान असणार आहे. याठिकाणी होणारे संशोधन थेट उद्योगांना विकता येईल. यातून उद्योगांची असणारी गरज पूर्ण करता येईल. यावेळी कुलसचिव डॉ. साधना पांडे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, संचालक डॉ. महेंद्र शिरसाट यांची उपस्थिती होती.

टॅग्स :universityविद्यापीठbusinessव्यवसाय