शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत शिक्षक भरती प्रक्रिया सुरु करा; विद्यार्थी संवादातून रोहित पवारांचा सरकारला इशारा

By राम शिनगारे | Updated: August 16, 2023 18:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या हिरवळीवर रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला

छत्रपती संभाजीनगर : शिक्षक भरतीसाठी येत्या काही दिवसात संबंधित मंत्र्यांची भेट देऊन भरतीप्रक्रिया सुरू करण्यासाठी १५ दिवसाची मुदत दिली जाईल. त्यानंतरही भरतीला सुरुवात न झाल्यास विद्यापीठ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा बेरोजगार युवकांचा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी केली. निमित्त होते विद्यापीठात आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या हिरवळीवर आज दुपारी अधिसभा सदस्य डॉ. नरेंद्र काळे, प्रा. शेख जहुर, प्रा. बंडू सोमवंशी, विद्यापरिषद सदस्य डॉ. राजेश करपे यांनी ' विद्यार्थी संवाद' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी एमपीएससी आयोगाच्या परीक्षा, विविध विभागातील भरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस संस्थांकडून घेण्यात येणारे परीक्षा शुल्क, सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांकडून संशोधक विद्यार्थ्यांची होणाऱ्या कोंडीवर विविध विद्यार्थ्यांनी प्रश्नांची बरसात केली. यात परमेश्वर माने, महेंद्र मुंढे, धर्मराज जाधव, डॉ. गणेश बडे आदींनी समस्या मांडल्या. परमेश्वर माने याने परीक्षा शुल्काचा मुद्दा उपस्थित करीत विद्यार्थ्यांची होणारी लुट थांबविण्याची मागणी केली. तर डॉ. गणेश बडे यांनी प्राध्यापक, शिक्षकांची १०० टक्के भरतीची मागणी केली. 

विद्यार्थ्यांच्या मुद्यांवर बोलताना आ. रोहित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांच्या मागण्याकडे लक्ष वेधल्याचे सांगितले. तसेच टीसीएसकडून १ हजार रुपयांचे आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्यासाठी लढा उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, डॉ. राम चव्हाण, विठ्ठल गडदे, प्रा. अमोल औटे, दीपक सांळुके, डॉ. विश्वनाथ कोक्कर, डॉ. विनय लोमटे, डॉ. ह. नी. सोनकांबळे, डॉ. दीपक बहीर, अजय पवार आदींची उपस्थिती होती.

आश्वासनांच्या पुर्ततेसाठी कायदा हवाविद्यार्थी, युवकांच्या आंदोलन, उपोषणावेळी वेगवेगळे मंत्री, आमदार, राजकीय नेते विविध आश्वासने देऊन माघार घेण्यास भाग पाडतात. त्यानंतर त्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. मंत्र्यासह इतरांनी दिलेल्या आश्वासनांच्या पुर्ततेसाठी विधिमंडळात कायदा करा, त्यामुळे बेरोजगारांची होणारी फसवणूक थांबेल अशी मागणीच युवकांनी आ. रोहित पवार यांच्याकडे केली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादRohit Pawarरोहित पवार