शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपाचे भोगवटा प्रमाणपत्र अभय योजनेवर मंथन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 18:11 IST

शहरातील २५० पेक्षा अधिक मोठ्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच देण्यात आलेले नाही. अभय योजना राबवून बांधकाम व्यावसायिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत योजना राबविण्याचा मानस महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमालमत्ता करातून दरवर्षी मनपाला ३०० कोटी रुपये मिळू शकतात.पाणीपट्टीतून १००, नगररचना विभागाकडून १००, तर ५० कोटी मालमत्ता विभागाकडून येऊ शकतात.महापौर नंदकुमार घोडेले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

औरंगाबाद : शहरात विकास कामे करण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसेच नाहीत. पगार व अत्यावश्यक कामांपुरताच पैसा उपलब्ध असतो. शहरातील २५० पेक्षा अधिक मोठ्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच देण्यात आलेले नाही. अभय योजना राबवून बांधकाम व्यावसायिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत योजना राबविण्याचा मानस महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला. मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.

अस्थिर पदाधिकार्‍यांनी कधीच मनपाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ दिले नाही. मालमत्ता करातून दरवर्षी मनपाला ३०० कोटी रुपये मिळू शकतात. पाणीपट्टीतून १००, नगररचना विभागाकडून १००, तर ५० कोटी मालमत्ता विभागाकडून येऊ शकतात. मनपा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असे ठोस निर्णय कधी घेण्यात आले नाहीत. त्याचे परिणाम आज मनपासह औरंगाबादकरांना भोगावे लागत आहेत. दरवर्षी १ हजार ते १२०० कोटींचा अर्थसंकल्प तयार होतो. प्रत्यक्षात तिजोरीत ५०० ते ५५० कोटी रुपये येतात.

शासनाकडून जीएसटीपोटी महिन्याला २० कोटी रुपये प्राप्त होतात. या निधीवर कर्मचार्‍यांचा पगार, अत्यावश्यक कामे करण्यात येतात. मागील दहा वर्षांत महापालिकेने अनेक मोठ्या इमारतींना बांधकाम परवानगी दिली आहे. या व्यावसायिकांनी मनपाकडून भोगवटा प्रमाणपत्रच घेतलेले नाही. मोठ्या २५० इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिल्यास महापालिकेच्या तिजोरीत सहज १०० कोटी रुपये येऊ शकतात. त्यासाठी अगोदर मनपाला अभय योजना राबवावी लागणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

यापूर्वी मनपाने अनेकदा बिल्डरांना भोगवटा प्रमाणपत्र घ्यावे असे आवाहन केले; मात्र मनपाच्या या विनंतीला कधीच मान देण्यात आला नाही. आता या विषयावर अंतिम तोडगा काढण्यासाठी अभय योजना जाहीर करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१८ अशी दोन महिने ही योजना लागू राहील. त्यात बांधकाम व्यावसायिकांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही घोडेले यांनी नमूद केले.

दरवर्षी एक हजार इमारतींना मंजुरीमनपाच्या नगररचना विभागाकडे दरवर्षी १४०० ते १५०० फायली बांधकाम परवानगीसाठी येतात. त्यातील १ हजार ते १२०० फायली मंजूर होतात. छोट्या घरांच्या फायली पन्नास टक्क्यांहून अधिक असतात. उर्वरित फायली बांधकाम व्यावसायिकांच्या असतात. मागील दहा वर्षांमध्ये मनपाने ५०० ते ७०० मोठ्या गृहप्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यातील ९० टक्के व्यावसायिकांनी भोगवटा प्रमाणपत्रच घेतलेले नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद