शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

स्टार क्रिकेटर केदार जाधव एपीएलमध्ये खेळणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 13:32 IST

एपीएलच्या दहाव्या पर्वात २५ लाखांपर्यंत पारितोषिके

औरंगाबाद : लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या लोकमत औरंगाबाद क्रिकेट प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वात भारतीय स्टार क्रिकेटपटू केदार जाधव हा असीफ पटेल यांच्या किंग वॉरियर्स संघाकडून खेळणार आहे. गरवारे स्टेडियमवर उद्या, मंगळवारी किंग वॉरियर्स संघाचा सामना दुपारी १.३० वाजता भवानी टायगर्स संघाविरुद्ध रंगणार आहे.

केदार जाधव याने भारताकडून ७३ वनडे सामने खेळताना १ हजार ३८९ धावा केल्या आहेत. तसेच ९ टी-२० सामने खेळले आहेत. तसेच इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळला आहे. नुकत्याच रणजी करंडक स्पर्धेत त्याने मुंबईविरुद्ध १२८ आणि आसामविरुद्ध २८३ धावांची खेळी केली होती.

एपीएलच्या १०व्या पर्वाचे वेळापत्रक३० जानेवारी : - राव रॉयल्स विरुद्ध गुड्डू इएमआय २१, वेळ : दुपारी ३.३० वा.- मनजीत प्राइड वर्ल्ड विरूद्ध ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड, वेळ : रात्री ७:४५ मि.

३१ जानेवारी: - भवानी टायगर्स विरूद्ध पटेल किंग वॉरियर्स, वेळ : दुपारी २:३० वा.- मनजित प्राइड वि. शक्ती स्ट्रायकर्स, वेळ : सायंकाळी ५:०० वा.- राव रॉयल्स विरूद्ध कराड हॉक्स, वेळ : रात्री ७:४५ वा.

१ फेब्रुवारी: - शक्ती स्ट्रायकर्स विरूद्ध जेन्युएन रॉयल्स, वेळ : दुपारी १२:०० वा.- मनजीत प्राइड वर्ल्ड वि. शिंदे रायझिंग किंग्ज, वेळ दुपारी २:३० वा.- भवानी टायगर्स विरूद्ध राव रॉयल्स, वेळ : सायंकाळी ५:०० वा.- पटेल किंग वॉरियर्स वि. गुड्डू इएमआय २१, वेळ : ७:४५ वा.

२ फेब्रुवारी: - कराड हॉक्स वि. गुड्डू इएमआय २१, वेळ : दुपारी १२:०० वा.- शक्ती स्ट्रायकर्स वि. शिंदे रायझिंग किंग्ज, वेळ : दुपारी २:३० वा.- ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड वि. जेन्युएन रॉयल्स, वेळ : दुपारी ५:०० वा.- भवानी टायगर्स वि. कराड हॉक्स, वेळ : रात्री ७:४५ वा.

३ फेब्रुवारी: - शिंदे रायझिंग किंग्ज वि. जेन्युएन रॉयल्स, वेळ : दुपारी १२:०० वा.- राव रॉयल्स वि. पटेल किंग वॉरियर्स, दुपारी २:३० वा.- ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड वि. शक्ती स्ट्रायकर्स, वेळ : सायंकाळी ५ वा.- भवानी टायगर्स वि. गुड्डू इएमआय २१, वेळ : सायंकाळी ७:४५ वा.

४ फेब्रुवारी: - शिंदे रायझिंग किंग्ज वि. ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड, वेळ : दुपारी २:३० वा.- पटेल किंग वॉरियर्स वि. कराड हॉक्स, वेळ : सायंकाळी ५:०० वा.- जेन्युएन रॉयल्स वि. मनजित प्राइड वर्ल्ड, सायंकाळी ७:४५ वा.

५ फेब्रुवारी: - पहिली उपांत्य फेरीची लढत : (ए १ विरूद्ध बी २), वेळ : ५:०० वा.दुसरी उपांत्य फेरीची लढत : (बी १ विरूद्ध ए २)

६ फेब्रुवारी : अंतिम सामना, वेळ : सायंकाळी ७:४५ वा.

एपीएलच्या दहाव्या पर्वात २५ लाखांपर्यंत पारितोषिकेसोमवारपासून सुरू होणाऱ्या एपीएलच्या दहाव्या पर्वात खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. जवळपास २५ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे मिळविण्याची संधी खेळाडूंना असणार आहे. त्यामुळे खेळाडू मालामाल होणार आहेत.

पुरस्कारप्राप्त खेळाडूंना मिळणार आयफोन१० संघांचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेत मित्तल इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मालिकावीर, ऑरेंज कॅप, पर्पल कॅप आणि ‘बेस्ट आऊटसाइडर प्लेअर’ यांच्यासाठी प्रत्येकी एक आयफोन बक्षीसरूपाने देण्यात येणार आहे. या चार आयफोनची एकूण किंमत तब्बल २ लाख ८० हजार असणार आहे.

विजेत्यात २ तर उपविजेत्यास १ लाखाचे बक्षीसएपीएल स्पर्धेतील चॅम्पियन ठरणाऱ्या संघास २ लाखांचे, तर उपविजेत्यास १ लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूस मोफत मेंबरशिपप्रत्येक सामन्यात सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूंना हेल्थ अँड हार्मनी जिमतर्फे एका वर्षासाठी मोफत मेंबरशिप मिळणार आहे. स्पर्धेत एकूण २३ खेळाडूंना सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे.

विजेत्या संघाला गोवा सहलत्याचप्रमाणे स्मिता हॉलिडेजतर्फे एपीएलच्या अंतिम विजेत्या संघातील खेळाडू व सपोर्ट स्टाफसह २० ते २२ जणांना गोव्याची सहल असणार आहे. यात २ रात्र आणि ३ दिवस हॉल्ट राहणार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद