शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाचा औरंगाबाद विभाग ‘खिळखिळ्या’ बसपासून मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 18:28 IST

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील म्हणजे जिल्ह्यातील बसगाड्या खिळखिळ्यामुक्त झाल्या आहेत.

ठळक मुद्दे खड्डेमय रस्त्यांंमुळे मात्र बस पुन्हा-पुन्हा होताहेत खिळखिळ्याविभागात शिवशाहीसारख्या नव्या बसगाड्या दाखल करण्यासह बसच्या पुनर्बांधणीत बदल

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील म्हणजे जिल्ह्यातील बसगाड्या खिळखिळ्यामुक्त झाल्या आहेत. खडखड करणाऱ्या बॉडीची एकही बस राहिली नसून प्रवासी आणि चालकांसाठी बस आरामदायक झाल्याचा दावा विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी केला.

अनेक वर्षांपासून धावणाऱ्या एसटी बस खिळखिळ्या झाल्याने प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत होत्या. एसटीचा प्रवास प्रवाशांसाठी खडतर ठरत होता; परंतु गेल्या दोन वर्षांत एसटी महामंडळाने कात टाकली आहे. खाजगी बसच्या बरोबरीने टक्कर देत सेवा देत आहे. त्यासाठी शिवशाहीसारख्या नव्या बसगाड्या दाखल करण्यासह बसच्या पुनर्बांधणीत बदल केला आहे.

एसटी महामंडळाच्या बसच्या तुटलेल्या खिडक्या, फाटके सीट व पावसाळ्याच्या दिवसात छतामधून टपकणारे पावसाचे पाणी आणि प्रवाशांची कंबरडे मोडण्यासाठी, प्रवाशांची हाडे खिळखिळी करणारे अशी प्रतिमा दूर केली जात आहे. औरंगाबाद विभागात ६१६ बसगाड्यांचा ताफा आहे. प्रत्येक बसची वेळीच देखभाल-दुरुस्ती होईल, यासाठी विभागाने प्राधान्याने लक्ष केंद्रित केले. त्यामुळे बसच्या अवस्थेत सुधारणा झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामध्ये आजघडीला विभागात एकाही बसची बॉडी खराब नाही. त्यामुळे प्रवासी आणि चालकांना प्रवासात कोणताही त्रास जाणवत नसल्याचे प्रशांत भुसारी यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

खिळखिळी बस बनली स्टील बॉडीचीविभागातील खिळखिळ्या आणि भंगार बसचे रूपांतर स्टील बॉडीच्या बसमध्ये करण्यात आले आहे. अशाप्रकारे गेल्या काही दिवसांत विभागातील २१ लाल बसने आता स्टील बॉडीच्या बसचा आकार घेतला आहे.

असा आहे ताफाविभागात ४१० लाल बस, ५८ एशियाड, २१ स्टील बॉडीच्या बस, ५४ शिवशाही, ८ शिवनेरी, १४ मिडी बस, शीतल बस ५ आणि ४६ शहर बस असा ६१६ बसचा ताफा आहे.

रस्त्यांनी बसची नादुरुस्तीबस खिळखिळी राहणार नाही, यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरूआहेत; परंतु प्रवासी वाहतूक करताना ग्रामीण भागासह अनेक मार्गांवरील रस्त्यांची दुरवस्था आहे. या रस्त्यांमुळे बसची बांधणी खिळखिळी होते, असेही महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन