शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

एसटी बस गेली ‘राजकारण्यांच्या सेवेसाठी’; प्रवाशांचे प्रचंड हाल, 'खासगी'ची मनमानी भाडेवसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 15:13 IST

औरंगाबादेतून तब्बल २५० बस मुंबईतील बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्यासाठी गेल्या होत्या.  

औरंगाबाद : अर्धा तास झाला... एक तास उलटला... तरी बस येईना, मगं कोणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फेऱ्या मारत होता, तर कोणी थेट जमिनीवर बसून बसची वाट पाहत होता. बऱ्याच वेळेनंतर एखादी बस येताच प्रवाशांचा तिच्याभोवती एकच गराडा पडत होता. दसऱ्या मेळाव्यासाठी औरंगाबादेतून २५० बस मुंबईला गेल्याने मंगळवारी प्रवाशांचे असे प्रचंड हाल झाले. एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे आहे की ‘राजकारण्यांच्या सेवेसाठी’ हे आहे, असा सवाल प्रवाशांनी केला.

मुंबईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दसरा मेळावे होणार आहेत. या मेळाव्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मेळाव्यासाठी मुंबईला औरंगाबाद विभागाच्या २५० बस पाठविण्यात आल्या. प्रत्येक आगारातील काही बस यासाठी रवाना करण्यात आल्या. सकाळीच सिल्लोड, कन्नडमार्गे बहुतांश बसगाड्या मुंबईला रवाना झाल्या. औरंगाबाद विभागाबरोबर जालना विभागाच्या ७५ आणि अहमदनगर विभागाच्या २५ बसही रवाना झाल्या.

औरंगाबाद जिल्ह्यातील ५३६ पैकी २५० बस कमी झाल्याने सकाळपासूनच प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. मध्यवर्ती बसस्थानकातून धावणाऱ्या गुलबर्गा, विजापूर, गाणगापूर आदी बस रद्द झाल्या. गंगापूर, पैठणसह ग्रामीण भागांतील बसगाड्यांची सेवा विस्कळीत झाली. अशा परिस्थितीत खासगी वाहतूकदार बसस्थानकात घुसून प्रवासी बाहेर नेत होते. बसगाड्या नसल्याची संधी साधत खासगी वाहतूकदार मनमानी भाडेवसुली करीत होते.

एसटी’चे अधिकारी म्हणाले...एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले, निवडणूक, गौरी-गणपतीच्या कालावधीतही बस पाठविण्यात येेतात. त्याचप्रमाणे मुंबईसाठीही प्रासंगिक करारावर बस पाठविण्यात आल्या आहेत. इतर विभागाची बससेवा सुरळीत आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

अर्धा तास ताटकळलोपैठणला जाण्यासाठी बसस्थानकात आलो; पण अर्धा तास झाला तरी बस आलेली नाही. बस कधी येईल, हे कोणी सांगतही नव्हते. माझ्यासह अनेक जण ताटकळले. - भाऊसाहेब जायभाय, प्रवासी

मुंबईला बस गेल्याचे कळलेदुपारी १२ वाजता बसस्थानकात आलो. साडेबारा वाजून गेले तरी बस येण्याचा पत्ता नाही. इतर दिवशी थोड्या थोड्या अंतराने पैठणच्या बस येत होत्या. मुंबईला बस गेल्याने उशीर होत असल्याचे समजले.- नीलेश हजारे, प्रवासी

औरंगाबाद विभागातून गेलेल्या बस आगार - बसची संख्यासिडको बसस्थानक - ४८ मध्यवर्ती बसस्थानक - ४२ पैठण - ३०सिल्लोड - ३६ वैजापूर - २८ कन्नड - २८ गंगापूर - २५ सोयगाव - १३ एकूण - २५०

 

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादDasaraदसरा