शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result 2020: औरंगाबाद विभागात पुन्हा मुलींची बाजी; जालना जिल्हा ठरला अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 19:14 IST

औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला आहे.

ठळक मुद्देनिकालावर भूगोलच्या पेपरमुळे परिणाम 

औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी ( दि.२९ ) दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यामध्ये औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे यावर्षीही विभागातून मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. राज्यात औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. 

कोरोनामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल यावर्षी जुलैच्या शेवटी जाहीर झाला. औरंगाबाद विभागातून १ लाख ८५ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ८४ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १ लाख ६९ हजार ९९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

निकालावर भूगोलच्या पेपरमुळे परिणाम दहावीचा परीक्षा कालावधी ३ मार्च ते २३ मार्च असा होता. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेवटचा पेपर भुगोल पेपर रद्द करण्यात आला होता. यामुळे भुगोल विषयांचं गुणदान कसं करायचं हा तिढा होता. अखेर मंडळाने निर्णय घेत बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं भुगोल विषयाच्यागुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. 

विभागात जालना जिल्ह्याची बाजीऔरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याचा सर्वाधिक निकाला लागला आहे. जालना जिल्ह्याचा निकाल ९४.०४ टक्के लागला आहे. जिल्ह्यात एकूण ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३० हजार ४३३ मुले उत्तीर्ण झाली. औरंगाबाद ९२.१०, बीड ९१.२४, परभणी ९०.६६ तर हिंगोली जिल्ह्याचा निकाला ९१.९४ टक्के लागला आहे. 

पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य आहे. ही प्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत विहित शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत तर छायांकितप्रतीसाठी ३० जुलै ते १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद