शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

चिकलठाणा विमानतळासाठी भूसंपादनाचा श्रीगणेशा; विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक

By मुजीब देवणीकर | Updated: December 19, 2023 15:51 IST

चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीची लांबी ९ हजार ३०० फूट आहे. धावपट्टीची लांबी १२ हजार फूट करा, असा प्रस्ताव आहे.

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळासाठी जागा अपुरी पडत आहे. विमानतळ प्राधिकरण मागील अनेक वर्षांपासून भूसंपादनाची मागणी करीत आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी महापालिकेतील विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांची ५२ हेक्टर जागा संपादित करण्यासाठी नेमणूक केली. लवकरच चिकलठाणा, मुकुंदवाडी, मूर्तिजापूर भागातील जमिनींचे भूसंपादन होणार आहे. विशेष बाब म्हणजे भूसंपादन करताना पुनर्वसन, पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याच्या अधिनियमाचा वापर करावा, असेही म्हटले आहे.

चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीची लांबी ९ हजार ३०० फूट आहे. धावपट्टीची लांबी १२ हजार फूट करा, असा प्रस्ताव आहे. त्यासाठी अतिरिक्त १८२ एकर जागा लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. जून २०२२ मध्ये भूमी अभिलेख कार्यालय, महसूल विभाग व महापालिकेने दक्षिण बाजूने १४७ एकर जमिनीची संयुक्त मोजणी केली. १३९ एकर जमीन खासगी मालकीची तर ८ एकर जागा सिडको विभागाची आहे. त्यानंतर भूसंपादनाच्या प्रक्रियेला पाहिजे तशी गती मिळत नव्हती. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी महापालिकेतील विशेष भूसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे यांची नियुक्ती केली. त्यांना भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

कोणत्या सर्व्हे-गटाचे भूसंपादन?चिकलठाणा- ३८८,३९६, ३९७, ४५४,३९८,३९९,४५६,४०१,४०२,४१९,४००,४२१,४१६,४१७,४१८,४३१ ते ४३६, ४५२,४५३,५२२,५२५,५२९,५३०,५३१,५३२,५३३/१, ५३५ ते ५३९, ४२२, ४२३,४२४,४२६,७४८.संपादित करायचे क्षेत्र-४५.९६८४ हेक्टरमुकुंदवाडी- १३,१५,१६,१७,१८,२१,२२,२६.संपादित करायचे क्षेत्र-२.४३०३ हेक्टरमूर्तिजापूर-३४ /२,२९/१, ३०.३१संपादित करायचे क्षेत्र-४.२५४३ हेक्टर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ