शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या मापातील पापाला बसणार चाप; भरारी पथके तपासणार साखर कारखान्यांची वजनकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 17:18 IST

भरारी पथक स्वयंस्फुर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेटी देवून वजन काट्यांची तपासणी करणार आहेत.

पैठण : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झालेला  असून उसाच्या मापात पाप होत असल्याच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सध्या केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार  साखर कारखान्यांचे वजन काटे तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. कारखान्याच्या वजन काट्या संदर्भात आक्षेप असल्यास शेतकऱ्यांनी भरारी पथकाकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

भरारी पथक स्वयंस्फुर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेटी देवून वजन काट्यांची तपासणी करणार आहेत. शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे देण्यात येते किंवा कसे याची खात्री करणार आहे. एखाद्या साखर कारखान्यावर वजनाबाबत गैरप्रकार होत असल्याची तक्रार  प्राप्त झाल्यावर लगेच त्या ठिकाणी वजन काट्याची तपासणी करुन गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, पैठण. बारामती अँग्रो कन्नड, घ्रुष्णेश्वर सहकारी साखर कारखाना, खुलताबाद. रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना, विहामांडवा ता पैठण. मुक्तेश्वर शुगर लि. धामोरी ता गंगापूर. छत्रपती संभाजी राजे साखर कारखाना चितेपिंपळगाव ता औरंगाबाद. सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना सिल्लोड या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. 

शेतकऱ्यांनी तक्रार करावीयंदा सरासरी पेक्षा जास्त ऊस शेतकऱ्यांकडे असल्याने कारखाने ऊस घेऊन जातील का ? या विवंचनेत सध्या शेतकरी आहेत. कारखान्यावर उसाच्या वजन काट्यावर आक्षेप घेण्याचे धाडस शेतकरी करीत नाहीत यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. मापा संदर्भात आक्षेप असल्यास पथकाकडे तक्रार करावी असे आवाहन पथकाचे सदस्य चंद्रकांत झारगड यांनी केले आहे. 

भरारी पथके करणार तपासणी प्रत्येक साखर कारखान्यांवर वजनकाटय़ाजवळ २०-२० किलोची वजने असतात. मात्र शेतकरी कधीच काटा करताना त्या ठिकाणी जात नाही अथवा त्या वजनकाटय़ावर ती वजने ठेवून साखर कारखान्यातील काटय़ाची तपासणी करण्याचे धाडस दाखवत नाही. म्हणून भरारी पथकाने वेळोवेळी तपासणी करून अहवाल सादर करावा. तसेच तपासणी दरम्यान पथकातील शेतकरी प्रतिनिधी उपलब्ध न झाल्यास कारखान्यावर उपस्थित दोन शेतकऱ्यांना पथकात सहभागी करून घ्यावे असे आदेशात म्हटले आहे.

कारखाना निहाय भरारी पथक सदस्य...- शरद सहकारी साखर कारखाना विहामांडवा ता. पैठण : तहसीलदार, सहायक पोलीस निरीक्षक ( पाचोड ) , वैध मापन निरीक्षक ( पैठण ), लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी माऊली मुळे.- संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण : तहसीलदार ( पैठण ) , पोलीस निरीक्षक ( पैठण ) , वैध मापन निरीक्षक ( पैठण ) , ए.जी. जाधव,लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी चंद्रकांत झारगड.- बारामती अँग्रो लिमिटेड, कन्नड : तहसीलदार कन्नड, पोलीस निरीक्षक कन्नड, वैधमापन निरीक्षक पैठण, लेखापरीक्षक, व शेतकरी प्रतिनिधी चंद्रकांत झारगड. - घ्रुष्णेश्वर साखर कारखाना, खुलताबाद : तहसीलदार खुलताबाद, पोलीस निरीक्षक खुलताबाद, वैधमापन निरीक्षक खुलताबाद, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी चंद्रशेखर साळुंके. - मुक्तेश्वर साखर कारखाना, गंगापूर : तहसीलदार गंगापूर, पोलीस निरीक्षक गंगापूर, वैधमापन निरीक्षक गंगापूर, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी शिवाजीराव साबळे. - छत्रपती संभाजी राजे कारखाना चितेपिंपळगाव : तहसीलदार औरंगाबाद, पोलीस निरीक्षक औरंगाबाद, वैधमापन निरीक्षक औरंगाबाद, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी आरेफ पठाण. - सिध्देश्वर साखर कारखाना, सिल्लोड : तहसीलदार सिल्लोड, पोलीस निरीक्षक सिल्लोड, वैधमापन निरीक्षक सिल्लोड, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी के जी साबळे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी