शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींना अनोखी आदरांजली; २५६५ जणांची एकाच वेळी सूतकताई, रेकॉर्डची झाली नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 19:24 IST

महात्मा गांधी जयंती विशेष : एकाचवेळी २ हजार ५६५ विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक चरखा सूतकताई करीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली, या उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन संस्थेने एकाच वेळी सूतकताईचा विक्रम नोंदवला आहे. जेएनईसी महाविद्यालयाच्या मैदानावर एकाचवेळी २ हजार ५६५ विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक चरखा सूतकताई करीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. या उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असल्याची माहिती कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी दिली.

एमजीएम विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५ व्या जयंतीनिमित्त सामूहिक सूतकताईचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंदोर येथील आयआयटीतील प्रा. डॉ. कीर्ती त्रिवेदी, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी.एम. जाधव, कुलगुरू डॉ. सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या उपक्रमात सूतकताईसाठी आठ समूहांमध्ये प्रत्येकी २५० विद्यार्थी सहभागी झाले. प्रत्येक समूहाने अर्धा तास सूतकताईचे काम करीत या विक्रमामध्ये सहभाग नोंदविला. त्यासाठी स्पिंडल टकली ११०, दोन स्पिंडल चरखा १००, आठ स्पिंडल चरखा ३० आणि १० पेटी चरख्याचा वापर करण्यात आला आहे. खादीपासून तयार झालेले कपडे आणि विविध वस्तूंची खरेदी करण्यात येते. या वस्तूंच्या निर्मितीची प्रक्रिया विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी सूतकताईच्या माध्यमातून समजून घेतली. यावेळी नाट्यशास्त्र विभागाच्या राहुल खरे यांच्या संघाने विविध भजने व गीतांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राजू सोनवणे यांनी केले. आभार अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांनी मानले.

खादी हा एक विचारराष्ट्रपिता महात्मा गांधींचा अनेकांना विसर पडत आहे. त्यावेळी एमजीएम विद्यापीठात चरख्याद्वारे सूतकताई करण्यात येते. ही निश्चितच प्रेरणा देणारी बाब आहे. मिठाचा सत्याग्रह आणि खादी ग्रामोद्योग जागरणच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला घालवले. खादी केवळ कताई करण्यापुरती मर्यादित नसून, हा एक विचार असल्याचे प्रतिपादन डॉ. कीर्ती त्रिवेदी यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष डॉ. जाधव, कुलगुरू डॉ. सपकाळ, डॉ. गाडेकर यांच्यासह एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या न्यायनिर्णय प्रमुख रेखा सिंग यांनीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmgm campusएमजीएम परिसरMahatma Gandhiमहात्मा गांधी