शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडावर काळाचा घाला ! भरधाव टेम्पो उभ्या ट्रॅक्टरवर आदळून ६ वऱ्हाडी जागीच ठार,१४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 10:33 IST

मोढा फाट्यावर भीषण अपघात..लग्न लावून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला...

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड :(जि. औरंगाबाद) सिल्लोड तालुक्यातील मोढा फाट्यावर घाटशेंद्रा  येथून लग्न लावून मंगरुळकडे  परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप टेम्पोने रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला  पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पो मधील  ६ वऱ्हाडिंचा जागीच मृत्यू झाला तर १४ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास सिल्लोड ते भराडी रस्त्यावर मोढा फाट्यावर  झाला.

 

या अपघातात जागीच ठार झालेल्या इसमाची नावे अशी,जिजाबाई गणपत खेळवणे वय ६० वर्ष, संजय संपत खेळवणे वय ४२ वर्ष, संगीता रतन खेळवणे वय ३५ वर्ष, लक्ष्मीबाई अशोक खेळवणे वय ४५ वर्ष,अशोक संपत खेळवणे वय ५२ वर्ष ,रंजनाबाई संजय खेळवणे वय ४० वर्ष सर्व रा.मंगरूळ असे आहे.

तर अपघातात गंभीर जखमींची नावे : कासाबाई भास्कर खेळवणे वय ४० वर्ष, अजिनाथ शेषराव खेळवणे वय ४५,आकाश रमेश बोर्डे वय १८,ऋषिकेश गोविंदराव आरके वय २०,संतोष गणपत खेळवणे वय३०,धुलाबाई नारायण बोर्डे वय ५०, दुर्गाबाई दत्तात्रय खेळवणे वय ४५, सुलोचना आत्माराम खेळवणे वय ५५ ,गणेश सुखदेव बोर्डे वय १९ वर्ष सर्व रा.मंगरूळ हे ९ प्रवाशी गंभीर जखमी झाले त्यांना पुढील उपचार साठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले तर सार्थक अजिनाथ खेळवणे वय ८ वर्ष, ओमकार रतन खेळवणे वय १६, कलाबाई बाबू म्हस्के वय ५० वर्ष, सुभाष राजेश खेळवणे वय ४५, सुरेश विठल खेळवणे वय ५० वर्ष या पांच लोकांवर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

झोपेमुळे वाहनावरील नियंत्रण सुटले :

मंगरूळ येथील शिवराम मुकुंदा खेळवणे यांचा बुधवारी संध्याकाळी घाटशेंद्रा येथे विवाह होता.ते लग्न लावून रात्री ही वऱ्हाडी मंडळी परत मंगरूळ येथे येत होती.झोपेच्या नादात वाहणावरील नियंत्रण सुटून पिकअप ( क्रमांक एम एच २० सी टी -२९८१)  हा रस्त्याच्या कडेला ऊस भरून नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या विना क्रमांकाच्या  ट्रॅक्टर ला जाऊन धडकला.अपघात इतका भीषण होता की पिकअप चे तुकडे तुकडे झाले.अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, फौजदार विकास आढे, लक्ष्मण कीर्तने, अनंत जोशी व कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली लोकांच्या मदतीने जखमी व मृतांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मृतांमध्ये दोन पती पत्नी ठार..या अपघातात एकाच कुटुंबातील व नवरदेवाचे चुलते काका काकू रंजनाबाई संजय खेळवणे व संजय संपत खेळवणे , लक्ष्मीबाई अशोक खेळवणे व अशोक संपत खेळवणे हे दोघे पती पत्नी जागीच ठार झाले. या घटनेमुळे तालुका हादरला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद