शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव शिवाई इलेक्ट्रिक बसची कारला पाठीमागून धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 13:17 IST

एसटीच्या शिवाई इलेक्ट्रिक बसचा राज्यातील पहिला अपघात छत्रपती संभाजीनगरजवळ, कार चालकाचा जागीच मृत्यू, तर कारमधील ५ जण जखमी

वाळूज महानगर : अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवाई बसने कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी मध्यरात्री वाळूजजवळ घडली. या अपघातात कारचालक सय्यद जावदे सय्यद हनीफ (३३, रा. देऊळगाव मही, जि.बुलढाणा)  याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील ५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

राज्य परिवहन महामंडळाची इलेक्ट्रिक शिवाई बस (क्रमांक एम.एच.१२,व्ही.एफ.४०३४) ही रविवारी रात्री अहमदनगर आगारातून छत्रपती संभाजीनगरकडे निघाली. वाळूजच्या पथकर नाक्याजवळ भरधाव वेगातील या बसने समोरील कारला ( क्रमांक एम.एच.२८, ए.५७८६) पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेमुळे कार रस्ताच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन उलटली. 

अपघातात कारचालक सय्यद जावेद सय्यद हनीफ (३३, रा.देऊळगावराजा, जि.बुलढाणा) हा गंभीर जखमी होऊन मरण पावला. तर कारमधील  शेख वसीम शेख मुस्लिम (३०), दानिश खान रियाज खान (३०), शेख इसाक शेख गुलाम (२८), शेख समीर शेख नजीर (२७, सर्व रा.देऊळगाव मही, ता.देऊनळगावराजा, जि.बुलढाणा) हे पाच जण गंभीर जखमी झाले. 

माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गिता बागवडे, उपनिरीक्षक सखाराम दिलवाले, पोहेकॉ.अभिमन्यु सानप आदींनी अपघातस्थळी जाऊन जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघातास कारणीभूत शिवाई बसचालक सागर गोकुळ भिंगारे (२६, रा.जैतापूर-हतनुर, ता.कन्नड) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात कारच्या पाठीमागील व बसच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद