शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ही आहे गरिबाला मोफत अन्न, कपडा देणारी न्यारी ‘बँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 19:44 IST

दररोज ५०० ते ७०० लोकांची येथे भागविली जाते भूक 

ठळक मुद्देसामाजिक उत्तरदायित्वातून सुरु आहे उपक्रम पाण्याचे जारही वितरित दोन हजार विद्यार्थिनींनी घेतले मोफत प्रशिक्षण २३ हजार कपड्यांचे होणार वाटप

औरंगाबाद : शहरात असे अनेक गरीब लोक राहतात, त्यांना एक वेळचे जेवण मिळणे कठीण असते. अनेकदा उपाशीपोटी झोपावे लागते. अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे नसतात. अशा लोकांना पोटभर अन्न व कपडे देण्यासाठी शहरात रोटी व कपडा बँक सुरू करण्यात आली आहे. मागील ३ वर्षांपासून या बँकेचा  लाभ हजारो गरीब घेत आहेत. 

शहरातील एकही गरीब उपाशी झोपू नये व कपड्याविना राहू नये, या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी बायजीपुरा-जिन्सी रस्त्यावर रोटी बँकेला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ कपडा बँकेलाही सुरुवात झाली. शहरात एवढी जागरूकता वाढली आहे की, कुठे लग्नकार्य अन् मंगल कार्य असले व तेथे अन्न शिल्लक राहिल्यास त्या मंगल कार्यालयातून या रोटी बँकेत आणल्या जाते. याशिवाय हॉटेलमध्ये दररोज शिल्लक राहणारे अन्न, कंपन्यांच्या कँटिनमध्ये शिल्लक  राहणारे अन्न तसेच रोटी बँकेचे सदस्यही दररोज या बँकेत अन्न आणून देतात.  येथे ४ हजार किलोपर्यंतचे अन्न साठविण्यासाठी शीतकरण व्यवस्था आहे. ५०० ते ७०० दरम्यान गरीब लोक येथून अन्न घेऊन जातात व आपली भूक भागवितात. तसेच कपडा बँकेतही अनेक लोक कपडे आणून देतात. तेच कपडे गरिबांना वाटले जातात. याशिवाय पाणी देणे हे महान कार्य आहे. यासाठी ‘वॉटर बँक’ही सुरू करण्यात आली आहे. दररोज शेकडो लोक शुद्ध पाणी नेत असतात. येथून प्रत्येकी २० लिटरचे ४ हजार जार पाणी दररोज वाटप करण्यात येते. संपूर्णपणे ही सेवा मोफत आहे.

दुष्काळामुळे अनेक भागात पाण्याची टंचाई आहे. येथील नागरिकांना या वॉटर बँकेचा मोठा फायदा होत आहे. याशिवाय मागील तीन वर्षांपासून दरवर्षी शेकडो रुग्णांचे मोफत मोतीबिंदूचे आॅपरेशन करण्यात येते. रोटी बँकेच्या या उपक्रमाची देशभर चर्चा झाली आहे. या संस्थेचा आदर्श घेत अकोला व पुणे येथे रोटी बँक सुरू करण्यात आली आहे. विविध ठिकाणाहून अन्न जमा करण्यासाठी मोफत दोन व्हॅन देण्यात आल्या आहेत. 

दोन हजार विद्यार्थिनींनी घेतले मोफत प्रशिक्षण गरीब विद्यार्थिनींना व्यावसायिक कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी तीन वर्षांपासून हारुण मुकाती इस्लामिक सेंटर कार्यरत आहे. यात कॉम्प्युटर कोर्स, स्पोकन इंग्लिश, शिलाई, फॅशन डिझाईन, ब्युटीपार्लर क्लासेसपासून ते पाककलापर्यंत विविध प्रशिक्षण मोफत दिले जात आहे. आजपर्यंत दोन हजार विद्यार्थिनींनी येथे प्रशिक्षण घेतले आहे.

२३ हजार कपड्यांचे होणार वाटपरमजाननिमित्त गरिबांना हारुण मुकाती इस्लामिक सेंटरच्या वतीने २३ हजार कपड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. डेड स्टॉकमध्ये असलेले कपडे व्यापाऱ्यांनी येथे आणून दिले आहेत. औरंगाबादसह वैजापूर, परभणी, मुंबई, सुरत, इंदोर येथील व्यापाऱ्यांनी दुकानातील कपडे आणून दिले आहेत. हे सर्व कपडे दि. १ आणि २ जून रोजी सकाळी ११ ते ५ मोफत वाटप करण्यात येणार आहेत. 

चाय पे शादी गरीब कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न पैशांमुळे अडू नये यासाठी ‘चाय पे शादी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हारुण मुकाती इस्लामिक सेंटरच्या वरच्या मजल्यावर अत्यंत साध्या पद्धतीने लग्न लावून दिले जाते. यावेळी  केवळ  वऱ्हाड्यांना चहा दिला जातो. मागील वर्षभरात ७० पेक्षा अधिक लग्न ‘चाय पे शादी’ या उपक्रमाद्वारे लावण्यात आले आहेत. यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय वधू-वर नोंदणी केंद्राची स्थापनाही करण्यात आली आहे. याद्वारे तीन वर्षांत शेकडो लग्ने जुळविण्यात आली आहेत. 

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवकAurangabadऔरंगाबाद