शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जागा एक लाख २० हजार; नोंदणी १८ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:38 IST

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना घरघर लागलेली असतानाच तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) प्रवेशालाही अल्यल्प प्रतिसाद मिळाल्याने येणाऱ्या काही दिवसांत तंत्रनिकेतनही बंद पडण्याची चिन्हे आहेत. राज्यात ४३२ तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये १ लाख २० हजारांपेक्षा अधिक जागा उपलब्ध असून, या जागांवर प्रवेशासाठी मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अवघ्या १८ हजार १७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती समोर आली.

ठळक मुद्देतंत्रनिकेतन प्रवेशाला अत्यल्प प्रतिसाद : एकूण जागेच्या १५ टक्केही नोंदणी नाही; २७ जूनपर्यंत नोंदणीला मुदतवाढ

राम शिनगारेऔरंगाबाद : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना घरघर लागलेली असतानाच तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) प्रवेशालाही अल्यल्प प्रतिसाद मिळाल्याने येणाऱ्या काही दिवसांत तंत्रनिकेतनही बंद पडण्याची चिन्हे आहेत. राज्यात ४३२ तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये १ लाख २० हजारांपेक्षा अधिक जागा उपलब्ध असून, या जागांवर प्रवेशासाठी मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अवघ्या १८ हजार १७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती समोर आली. अत्यल्प प्रतिसादामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने नोंदणीची मुदत २७ जूनपर्यंत वाढविली आहे.राज्यात शासकीय आणि खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालयांची संख्या तब्बल ४३२ एवढी आहे. या महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया मागील वर्षापर्यंत सीईटी सेलकडे होती. मात्र, मागील वर्षी मोठ्या संख्येने जागा रिक्त राहिल्यामुळे यावर्षी ही प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी विभागाकडे घेतली. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी २२ मे रोजी मुंबईत राज्यातील सर्व तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुखांची बैठक उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव विजय सौरभ, संचालक डॉ. अभय वाघ यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी तालुकास्तरावर समुपदेशन करण्याचा निर्णय घेत १०० टक्के प्रवेशाची जबाबदारी महाविद्यालयांवर टाकण्यात आली. यासाठी तंत्रशिक्षण मंडळातर्फे १ कोटी रुपये खर्च करून करिअर मार्गदर्शन मेळावे घेणे बंधनकारक करण्याचा निर्णयही एप्रिलमध्ये घेण्यात आला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अल्प मिळाला आहे. राज्यातील एकूण जागांच्या तुलनेत दहा टक्के विद्यार्थ्यांनीही प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केलेली नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे राज्यातील ४३ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील उपलब्ध २० हजारही जागा यावर्षी भरणार नसल्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांतील जागा रिक्त राहणार असल्यामुळे ३८९ खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालये ओस पडण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtechnologyतंत्रज्ञानEducationशिक्षण